Agriculture news in marathi, Safflower is cultivated on only seven hundred and fifty acres in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात करडईची साडेसातशे एकरांवरच लागवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

अकोला ः तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामात महाज्योत अभियानामार्फत विदर्भात काही प्रमुख जिल्ह्यात करडई लागवडीचे नियोजन करण्यात आले होते.

अकोला ः तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामात महाज्योत अभियानामार्फत विदर्भात काही प्रमुख जिल्ह्यात करडई लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. हा प्रकल्प अकोला जिल्ह्यात सुमारे पाच हजार एकरांवर राबविला जाणार होता. मात्र, याला पहिल्याच वर्षात शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जेमतेम साडेसातशे एकरांपर्यंत लागवड पोचल्याचा अंदाज आहे.

तेलबिया उत्पादन व प्रक्रीया प्रकल्प विदर्भात सुमारे १५ हजार हेक्टरवर राबवला जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांनी काढलेले उत्पादन हमी भावाने परत घेण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली. सोबतच शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदानही दिले जात होते.

राज्य, देशात सध्याच्या काळात तेलबिया उत्पादन व प्रक्रीया क्षेत्रात मोठी संधी मानली जाते. शासनाच्या खाद्यतेल धोरणाला अनुसरून नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील शेतकऱ्यांसाठी हा करडई उत्पादनाचा प्रकल्प तयार करण्यात आला होता.  त्यासाठी अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे तीन क्लस्टर तयार करण्यात आले.  याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्राने तांत्रिक मार्गदर्शन केले. 

प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना करडई पीक घेण्यासाठी प्रोत्साहन, सहभागी शेतकऱ्यांना महाज्योतीमार्फत बियाण्याचा मोफत पुरवठा, इतर कामांसाठी डीबीटीद्वारे एकरी २२०० रुपये थेट खात्यात, यंत्रांच्या साह्याने करडईची काढणी, उत्पादित माल हमीभावाने खरेदीची खात्री, असे पाठबळही दिले जात होते. बाजारपेठेत त्यावेळी जर वाढीव दर असेल तर तो देण्याची हमी होती. या शिवाय करडईची खरेदी, वाहतूक, साठवण, तेल काढणे, ग्रेडिंग, पॅकेजिंग ‘महाज्योती’मार्फत केली जाणार आहे. 

प्रकल्पाला पहिल्या वर्षात यश न मिळण्यास पीक काढण्याची उपलब्ध नसलेली साधनसामुग्री, उत्पादित मालाचा दर, यंत्रणांकडून शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यात झालेली चालढकल जबाबदार असल्याचे सांगितले जाते. प्रकल्पासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही ऑफलाइन पद्धतीनेही काही अर्ज घेतले गेले. तरीही उद्दिष्ट गाठता आले नाही.


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...