वाशीम जिल्ह्यात करडईची पाच हजार एकरवर होणार लागवड

वाशीम : या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून जिल्ह्यात करडईचा पेरा किमान ५००० एकरपर्यंत करण्याचे नियोजित आहे.
Safflower will be planted on 5,000 acres in Washim district
Safflower will be planted on 5,000 acres in Washim district

वाशीम :  या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून जिल्ह्यात करडईचा पेरा किमान ५००० एकरपर्यंत करण्याचे नियोजित आहे. तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या समन्वयातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

करडईचे क्षेत्र वाढवत असतानाच लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात प्रतिएकर ३ हजार रुपयांचा लाभ ‘डीबीटी’द्वारे दिला जाणार आहे. तरी करडई पेरणी करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ‘महाज्योती’च्या  https://mahajyoti.org.in/en/notice-board/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले.

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या व विमुक्त जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. त्यांच्या नावे जमीन असावी. आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदार शेतकरी हा आत्मा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. अर्जदार शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे, कमाल मर्यादा नाही. 

योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिएकर निविष्ठा मिळतील. उत्पादित झालेली करडई शासकीय हमीभाव ५ हजार ३५० रुपये प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत खरेदी करण्याची हमी राहील. करडईवर प्रक्रिया करून तेल विक्रीतून होणारा नफा प्रमाणात लाभांश डीबीटीद्वारे दिला जाईल.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर ‘आत्मा’ बीटीएम किंवा प्रकल्प समन्वयक मनीष बोरकर ( भ्रमणध्वनी क्र. ९१५८९१ ४६४८) यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com