agriculture news in marathi Saffron cultivation on experimental basis in Mahabaleshwar Keshar | Agrowon

महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केशर लागवड

मारुती कंदले
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता स्ट्रॉबेरीबरोबर ‘केशर’ साठी सुद्धा ओळखले जावे याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वर परिसरात राबवण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता स्ट्रॉबेरीबरोबर ‘केशर’ साठी सुद्धा ओळखले जावे याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वर परिसरात राबवण्यात येत असून तो यशस्वी झाल्यास एक महत्त्वाचे पर्यायी पीक याभागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल.

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. थंड वातावरणामुळे येथे दर्जेदार स्ट्रॉबेरी घेतली जाते. केशरकरिताही थंड वातावरणाची गरज असते, यामुळेच महाबळेश्‍वर परिसरात कृषी विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाबळेश्‍वर परिसरातील क्षेत्र महाबळेश्‍वर आणि मेत भुताड या दोन गावांमध्ये तीन शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. पावसामुळे लागवडीस उशीर झाला असला, तरी दोन महिन्यांपूर्वी येथे केशर लागवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच केशर लागवड करण्यात येत आहे. यापूर्वी काश्‍मिरातील सफरचंदाचा नाशिकला लागवडीचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्याच्या पातळीवर करण्यात आला आहे. 

महाबळेश्वरची ज्याप्रमाणे स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे तसेच ‘काश्मिरी केशर’ जगभरात उत्कृष्ट केशर म्हणून ओळखले जाते. या केशरचा भाव सुमारे साडेतीन लाख रुपये किलो असा आहे. काश्मीरमध्ये पंपोरे आणि किरतवाड या भागांमध्ये या केशराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केशराच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान, जमीन, प्रदेश उंची लागते. या उत्पादनासाठी लागणारे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरील असावे लागते. तेथील तापमान हे सरासरी 10 डिग्री सेल्सिअस असावे लागते. अशा ठिकाणी कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते.

केशरच्या लागवडीला महाबळेश्वर तालुक्यातील वातावरण आणि जमीन योग्य आहे. कृषी सहाय्यक दीपक बोरूडे यांच्या प्रयत्नातून कृषी विभागाने काही शेतकऱ्यांच्या शेतात केशरची लागवड केली आहे. केशरची लागवड ऑगस्टनंतर केली जाते. मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, म्हणून केशर लागवड केल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

राज्याचा कृषी विभाग महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना येथील वातावरणाचा फायदा घेऊन नावीन्यपूर्ण शेती प्रयोग राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. येथील हवामान, जमीन हे केशरसाठी चांगले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबर उत्पन्नाचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध होणार आहे

काश्मीरमधून आणले कंद...
महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्मीर येथील किश्‍तवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद दोन हजार चारशे रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये पस्तीस ते चाळीस कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत. 

प्रतिक्रिया..
नाविन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, म्हणून केशर लागवड केली आहे. कृषी सहायक दीपक बोर्डे यांची धडपड त्यामागे आहे.
- विजयकुमार राऊत, 
 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...