साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी वापरावे

विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतीसह अनेक विषयांवर ठराव करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करून तो पैसा शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी वापरावा, अशी मागणी करण्यात आली.
Sahitya Sammelan grants should be used for farmers and laborers
Sahitya Sammelan grants should be used for farmers and laborers

नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी येथे झालेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतीसह अनेक विषयांवर ठराव करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करून तो पैसा शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी वापरावा, अशी मागणी करण्यात आली. विद्रोही साहित्य चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी ठरावाचे वाचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी हसीब नदाफ होते. 

यामध्ये प्रामुख्याने शेतीविषयक ठराव चर्चेत आले. ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील कामगार, कष्टकरी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी समृद्धी मार्गविरोधी आंदोलन हाती घेतले त्यांना न्याय द्यावा. यावेळी राजू देसले यांचा जप्त करण्यात आलेला मोबाईल परत करावा. तसेच शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावेत. भूसंपादनासंदर्भात २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा व पिकाऊ जमीन प्रकल्पांसाठी घेऊ नये, असे तीन ठराव प्रामुख्याने त्यात होते.

करण्यात आलेले ठराव असे 

  • लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची हजारो गीते संग्रहित करून समग्र ‘भीमशाहीर वामनदादा कर्डक’ हा महाग्रंथ महाराष्ट्र शासनाने तत्काळ प्रसिद्ध करावा.
  • साहित्याचे सरसेनापती बाबूराव बागूल आणि कवी अरुण काळे यांचे स्मारक तत्काळ ठरल्याप्रमाणे पूर्ण करावे.
  • कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत करावी. या काळात काम करणाऱ्या सर्व मानधनावर कार्यरत कर्मचारी, कामगारांना किमान वेतन द्या.
  • महामानव छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे व सर्व महामानवांसंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
  • विद्यार्थी व कष्टकरीविरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा.
  • ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com