।। पंढरीची वारी आहे माझे घरी ।। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान

।। पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत।।
।। पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत।।

देहू, जि. पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी गुरुवारी (ता. ५) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. राज्यभरातील दिंड्या देहूत दाखल झाल्या असून, वारकऱ्यांबरोबरच हजारो भाविकही आले आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. बुधवारी सकाळपासून देऊळवाड्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर भाविकांची गर्दी होती. मंदिर परिसरात टाळ-मृदंग आणि तुकोबाच्या नामघोषाने भक्तिमय वातावरण झाले होते. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी देऊळवाड्यात दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनबारीतून भाविकांना देऊळवाड्यात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता, तर महाद्वारातूनही दिंडीकरांना प्रवेश दिला जात होता. प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. भाविकांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.पालखी मार्गावरील खड्डे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामपंचायतीने बुजविलेले आहेत. अनगडशावली बाबा दर्ग्याजवळील मेघडंबरीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पावसाच्या हजेरीने वारकरी सुखावले आषाढी वारी आणि पावसाचे समीकरण आहे. आषाढी वारी सुरू झाल्यानंतर पाऊस पडतो, वारकऱ्यांची धारणा आहे. यंदा मात्र पावसाने प्रस्थान सोहळ्यापूर्वीच दमदार हजेरी लावल्याने वारकरी, स्थानिक शेतकरीवर्ग सुखावला आहे. मानाचे अश्वही आले बुधवारी अनेक दिंड्या देहूत दाखल झाल्या. मानकरी, सेवेकरीही दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाची तयारी पूर्ण झाली असून, रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीचे गावात आगमन झाले आहे. मानाचे अश्वही आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com