‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

कोल्हापूर, सांगलीतील संसार सावरण्यासाठी मदतीचे आवाहन संपर्कासाठी Phone: ९८८१५९८८१५ Whatsapp : ९८८१०९९९०८ मिस्ड कॉल द्या : ९८८१०९९९०८ Web Link: http://esakal.in/srf ई-मेल ॲड्रेस : support@sakalrelieffund.com
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक कोटीची मदत
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे.  यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू  इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा...

  • सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
  • आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.
  • पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • संपर्कासाठी

  • Phone : ९८८१५९८८१५
  • Whatsapp : ९८८१०९९९०८
  • मिस्ड कॉल द्या : ९८८१०९९९०८
  • Web Link : http://esakal.in/srf
  • email : support@sakalrelieffund.com  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com