agriculture news in marathi, Sakal Relief Fund declares one crore for flood affected People in State | Agrowon

‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक कोटीची मदत
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगलीतील संसार सावरण्यासाठी मदतीचे आवाहन

संपर्कासाठी

  • Phone : ९८८१५९८८१५
  • Whatsapp : ९८८१०९९९०८
  • मिस्ड कॉल द्या : ९८८१०९९९०८
  • Web Link : http://esakal.in/srf
  • ई-मेल ॲड्रेस : support@sakalrelieffund.com

पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे. 

यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा...

  • सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
  • आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.
  • पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्कासाठी

 

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...