agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा | Agrowon

SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा
सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला ०१ तर राष्ट्रवादीला ०२ जागा मिळण्याच्या सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणाचा अंदाज

मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला ०१ तर राष्ट्रवादीला ०२ जागा मिळण्याच्या सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणाचा अंदाज

एक्झिट पोल २०१९ : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही याबाबत अंदाज दिले आहेत.

मराठवाड्यात एकूण ०८ जागा असून ०८पैकी भाजप ०३, शिवसेना ०२, राष्ट्रवादी ०२ तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच मराठवाड्यातील ०५ जागांवर युती तर ०३ जागांवर आघाडीचा विजय होईल, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडुकीमध्ये युतीला ०६ तर आघाडीला ०२ जागांवर यश मिळाले होते. या निवडणुकीत सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणांनुसार युतीला एका जागेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण जागांपैकी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ०३, शिवसेनेला ०३ तर काँग्रेसला ०२ जागांवर यश मिळाले होते या निवडणुकीत मात्र काँग्रेसला ०१ आणि शिवसेनेला ०१ जागेचा फटका बसताना दिसत असून राष्ट्रवादीला ०२ जागांचा फायदा होणार असल्याचे सकाळ आमि सामच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून 
सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला २९ आणि आघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...