agriculture news in marathi Sale of 30 kg gold on Dhantrayodashi in Jalgaon | Agrowon

धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

जळगाव : मंगळवारी (ता.२) धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदी केली. एकाच दिवसात ३० किलो सोने खरेदी ग्राहकांनी केली. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

जळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण बाजारपेठ प्रसिद्ध आहे. यंदा कोरोनानंतर प्रथमच सर्व अनलॉक होऊन नागरिक दिवाळी साजरी करीत आहेत. चांगला पाऊस झाला आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांमध्ये सर्वांचाच पगार हाती पडला आहे. यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची धूम सुरू आहे. मंगळवारी (ता.२) धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदी केली. एकाच दिवसात ३० किलो सोने खरेदी ग्राहकांनी केली. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

गेल्या वर्षी कोरोना होता. यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी कमी आहे. सराफ बाजारात गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२०) सोन्याचे दर ५१ हजार २०० ते ५१ हजार ३०० असे होते. यंदा सोन्याचे दर ४८ हजार ५०० ते ४८ हजार ३०० रुपये आहेत. वर्षभराच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे तीन हजार रुपयांनी कमी झाले आहे. हीच संधी साधून गुंतवणूकदार, सर्वसामान्य नागरिकांनी सोने खरेदीला महत्त्व दिले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी सर्वच सणांची चमक कमी होती. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. सराफ बाजार आता पूर्वीच्या तुलनेत सावरला आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकदेखील आतुर आहेत. धनत्रयोदशी व पाडव्याचा मुहूर्त मिळून यंदा विक्रमी सोने खरेदी होईल, असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. धनत्रयोदशीला ग्राहक सोन्याचे दागिने, सोन्याचा तुकडा किंवा शिक्के खरेदीला पसंती देतात. 

इटवेट, पेशवाई ज्वेलरी, अँटिक, टेम्पल, नक्षी ज्वेलरी, रोज गोल्ड, टर्की ज्वेलरी, इटालियन, छिलवा, कास्टिंग, ब्लॅक टेम्पल, कलकत्ती मीना ज्वेलरी, अजंता एलोरा, वेडिंग कलेक्शन अशा अनेक प्रकारात सुंदर डिझाइन्स खास दीपावली पर्वावर उपलब्ध आहेत. त्याला ग्राहकांची चांगली मागणी असल्याची माहिती रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांनी दिली.

दर ४७ हजार ९०० पर्यंत
सोने व चांदीच्या दरामध्ये सध्या घसरणीचा ट्रेंड अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने व चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी गुंतवणूकदारांसाठी चालून आलेली आहे. जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहारांना सुरवात झाली, तेव्हा २४ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ८०० ते ४७ हजार ९०० रुपये (३ टक्के जीएसटी वगळून) प्रतितोळा, तर चांदीचा दर सुमारे ६७ हजार रुपये प्रतिकिलो असा नोंदविले गेला.
 


इतर अॅग्रोमनी
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...