सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्री

व्हॉट्सअॅप, फेसबुक, वैयक्तिक संपर्क अशा सोशल माध्यमाचा वापर करून ग्राहक थेट शेतातच बोलावला. ग्राहकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिल्याने मळद (ता. बारामती) येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी कलिंगड व खरबुजाची तब्बल ६५ टनांची विक्री आहे.
Sale of 65 tons of watermelon through social media
Sale of 65 tons of watermelon through social media

पुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना कलिंगडे विकण्यासाठी अडचणी आल्या आहेत. वाहतूक बंद, बाजाराची अनिश्‍चितता, खरेदीदार नाही, ग्राहक नाही, तरीही शेतीमालाची विक्री करायचीच असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. त्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, वैयक्तिक संपर्क अशा सोशल माध्यमाचा वापर करून ग्राहक थेट शेतातच बोलावला. ग्राहकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिल्याने मळद (ता. बारामती) येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी कलिंगड व खरबुजाची तब्बल ६५ टनांची विक्री आहे.

चालू वर्षी सरकारने जवळपास एक एप्रिलपासून कोरोनाबाबत नियम कडक करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ऐन काढणीच्या वेळेस लाॅकडाउन झाल्याने शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना चांगलेच नाकीनऊ आले होते. त्याप्रमाणेच चालू वर्षी शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीच्या समस्या पुढे उभ्या राहिल्या होत्या. मात्र, श्री. वरे यांनी सोशल मीडियाद्वारे विक्री केलेला शेतमालाचा अनुभव पाठीशी असल्याने भरलेला ट्रॅक्टर शेताच्या बांधावर उभा केला. गेल्या १५ दिवसांत तब्बल  साडेआठ लाखांची थेट विक्री केली आहे. विशेष म्हणजे कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यात आली असल्याने ग्राहकांचा ही प्रतिसाद मिळाला.

शेतकरी श्री. वरे म्हणाले की, ‘‘शेतातील कलिंगड, खरबूज या फळांची मळद, निरावागज रोडवर मंगळवार (ता. १३) पासून कुठलीही गर्दी न करता विक्री व्यवस्था केली आहे. विक्रीसाठी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी विक्रीसाठी परवाना उपलब्ध करून दिला. चालू वर्षी एकूणच हा माल पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी शेतात उत्पादन घेतले होते. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद झाल्याने नुकसान होण्याची वेळ आली होती. त्यातून जागेवरच विक्री करण्याचे निर्णय घेतला. स्टॉलवर खरेदीसाठी अनेक व्यक्तींनी स्टॉलवर येऊन सुरक्षित अंतर ठेवून खरेदी केली. जेणेकरून सरकारच्या निर्णयामध्ये आपलाही मोलाचा वाटा ठरून शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होऊ शकतो.’’

सध्या शेतामध्ये एका खासगी कंपनीचे सुमारे सहा एकरांवर दोन रंग असलेले कलिंगड आहेत. त्याची साडेचार एकरांवर टप्याटप्याने डिसेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत लागवड केली होती. एक कलिंगड रंगाने पिवळे असून गर ही पिवळा आहे. तर दुसरे हिरव्या रंगाचे असून आतून लाल आहेत. ग्राहकांची मागणी चांगली आहे. कलिंगडाची प्रति किलो १५ ते २० रूपये, खरबूज प्रति किलो २५ दराने विक्री करत आहे. अजून अर्धा एकरातील कलिंगडे बाकी असून जवळपास १० ते १५ टन माल शिल्लक आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणेच विक्री केली नसती तर एकरी जवळपास सव्वा लाखाचे नुकसान झाले असते.मात्र, आता ग्राहक खरेदीसाठी येऊ लागले आहेत.

अशी केली विक्री शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ न देता विक्री व्यवस्था सुरू केली विक्रीसाठी सोशल मीडियाची मोठी मदत झाली नुकसान होण्याची भीती जास्त असल्याने घेतली खबरदारी शेतातच विक्री व्यवस्था सुरू केल्याने नुकसान टळले इतर गावांतील शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले. ते ही शेतावरच विक्री करू लागले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com