Sale of fertilizers at inflated rates
Sale of fertilizers at inflated rates

खतांची चढ्या दराने विक्री 

मागणी असूनही खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी विक्रेत्यांकडे खताची मागणी करत आहेत. मात्र, काही ठिकाणी खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत. मात्र मागणी असूनही खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी विक्रेत्यांकडे खताची मागणी करत आहेत. मात्र, काही ठिकाणी खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे अडचणीत आमची अजूनच लूट होत असल्याची ओरड शेतकरी करत आहेत. 

काही विक्रेत्यांकडे जी खतांची श्रेणी उपलब्ध आहे; त्यामध्ये ज्या जादा दर आकारून सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खतांच्या उपलब्धतेसह दराचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. एकीकडे जुना साठा आहे; मात्र अशा परिस्थितीत काही खत विक्रेते जुन्या साठ्याची विक्री नव्या सुधारित दराने करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

एकीकडे प्रतिकूल हवामान, शेतीत वाढता उत्पादन खर्च, त्यात खतांची टंचाई असा अनेक समस्यांनी शेतकरी बेजार झाला आहे. अशातच खतांची टंचाईमुळे शेतकऱ्यांना हंगामात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कृषी विभाग याला आळा घालणार की नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. 

परिस्थितीबाबत शेतकरी सांगतात... 

  • १०:२६:२६ खताची खूप टंचाई आहे. खताच्या गोण्या आल्या तरी १४४० ची गोणी १८०० रुपयाला 
  • खत गेली सहा महिन्यांपासून उपलब्ध नाही, लिकिंग चालू आहे 
  • खतांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण करून विक्रेते खिसे गरम करत आहेत 
  • प्रत्येक खतावर दुकानदार दुय्यम मिश्र खत घ्या, तरच नत्र पालाश व स्फुरद खत भेटेल असे सांगून अडवणूक
  • विभागीय कृषी कार्यालयास घेरावचा इशारा  खतटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वाढीव दराने खतांची विक्री सुरू आहे. तसेच ज्या खतांची शेतकऱ्यांना गरज नाही तेही खते घेण्याची काही विक्रेत्यांकडून बळजबरी केली जात असून शेतकरी त्रस्त झालेले आहे. कृषी विभागाने खतांचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना विभागीय कृषी कार्यालयास घेराव घालतील, असा इशारा देण्यात आला आहे.

    सर्व खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची तत्काळ तपासणी करून वाढीव दराने होणारी खत विक्री व बळजबरीने इतर खते औषधे घेण्याची सक्ती न करण्याची आपण लेखी आदेश काढावे.  - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

    सध्या बाजारात खतांचा मोठा तुटवडा आहे. दरापेक्षा अधिक विक्री सुरू आहे. साठेबाजांवर काही करता येईल का?  - जनार्दन कमोदकर, शेतकरी, कोळगाव, ता. येवला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com