agriculture news in marathi, Sale of one lakh liters of glyphosate in Yavatmal | Agrowon

यवतमाळात एक लाख लिटर ‘ग्लायफोसेट'ची विक्री

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

यवतमाळ  :  ग्लायफोसेट तणनाशकाची जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एक लाख लिटरपेक्षा जास्त विक्री होत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे. या  तणनाशकांची शिफारस चहामळ्यासाठी असूनही खरीप हंगामात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत अाहे. त्यामुळे कृषी संचालकांनी या संदर्भाने चौकशीचे आदेश दिल्याने कृषी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी आपल्याकडील माल वितरकाला परत पाठविण्यावर भर दिला आहे.

यवतमाळ  :  ग्लायफोसेट तणनाशकाची जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एक लाख लिटरपेक्षा जास्त विक्री होत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे. या  तणनाशकांची शिफारस चहामळ्यासाठी असूनही खरीप हंगामात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत अाहे. त्यामुळे कृषी संचालकांनी या संदर्भाने चौकशीचे आदेश दिल्याने कृषी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी आपल्याकडील माल वितरकाला परत पाठविण्यावर भर दिला आहे.

ग्लायफोसेट तणनाशक कार्सिनोजनिक गुणधर्माचे आहे. त्यांचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. या तणनाशकाचा वापर पिके नसलेल्या जमिनीवर व चहामळ्यासाठी करण्याची शिफारस  केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती फरिदाबाद यांनी केली आहे.

ग्लायफोसेट विक्री करणाऱ्या लहान-मोठ्या ३० ते ४० कंपन्या आहेत. काही नामांकित कंपन्यांची मागणी जास्त    असून लहान कंपन्यांचीसुद्धा तणनाशके बाजारात दाखल झाली आहेत. पेरणी झाल्यानंतर ग्लायफोसेटचा वापर होत असल्याने यावर प्रतिबंध घालण्याबाबत कृषी आयुक्तालयात सुनावणी सुरू आहे. त्यात यावर निर्बंध येण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, ग्लायफोसेट परत करण्यासाठी घाऊक, किरकोळ विक्रेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे.

दक्षता घेण्याचे आदेश
केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समितीने दिलेल्या शिफारशी व्यतिरिक्त इतर बाबींसाठी जिल्ह्यात ग्लायफोसेटचा वापर होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आदेश कृषी संचालकांनी दिले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...
जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा...अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा...
विदर्भात उष्ण लाट पुणे : राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने...
थकबाकीदारांना पीककर्जाचा मार्ग मोकळा;...मुंबई: खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार...
कृषी उद्योगांसाठी अजूनही चीन हाच...पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
भारत-पाकिस्तानात जूनमध्ये टोळधाडीचे...संयुक्त राष्ट्रसंघ: टोळधाडीने पिकांचे मोठ्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
राज्यातील बीज प्रक्रिया केंद्रांची कामे...पुणे: राज्यात नव्याने उभारली जाणारी बीज प्रक्रिया...