हिंगोली जिल्ह्यात साडेसोळा हजार क्विंटलवर बियाणे विक्री

हिंगोली जिल्ह्यात साडेसोळा हजार क्विंटलवर बियाणे विक्री
हिंगोली जिल्ह्यात साडेसोळा हजार क्विंटलवर बियाणे विक्री

हिंगोली : जिल्ह्यात या खरिपात ३ लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. त्यासाठी विविध पिकांच्या ८७ हजार १६९ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५६ हजार ४४५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. सोमवारपर्यंत (ता. १०) १६ हजार ९३६ क्विंटल बियाण्यांची, तर कपाशीच्या ४० हजार ६७२ पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल यांनी दिली.

नियोजित पेरणीत सोयाबीन २ लाख ३७ हजार ३१० हेक्टर, तूर ४३ हजार ११० हेक्टर, मूग ९ हजार ७६० हेक्टर, उडीद ८ हजार ३ हेक्टर, कापूस ४३ हजार ६८४ हेक्टर, ज्वारी ६ हजार ३१९ हेक्टर, मका १ हजार ६२३ हेक्टर आदी पिकांचा समावेश आहे.

निजोजित क्षेत्रानुसार गरज लक्षात घेऊन सोयाबीनच्या ७८ हजार ६ क्विंटल, ज्वारीच्या ६९०.४५, बाजरीच्या २.३४, भाताच्या १५, मुगाच्या ७४८.३२, उडदाच्या ४८५.५२, तुरीच्या ७ हजार ५६.६४ क्विंटल, अन्य पिकांसह बियाण्यांची एकूण ८७ हजार १६९.४९ क्विंटलची मागणी खासगी, सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केली.  सार्वजनिक कंपन्यांनी ९ हजार ८५, खासगी कंपन्यांनी ४७ हजार ३६० अशा एकूण ५६ हजार ४४५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला.

सोमवारपर्यंत सार्वजनिक कंपन्यांचे २ हजार ७२६, खासगी कंपन्यांचे १४ हजार २१० अशा एकूण १६ हजार ९३६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. याशिवाय सार्वजनिक कंपन्यांचे ६ हजार ३५९ आणि खासगी कंपन्यांचे ३३ हजार १५० क्विंटल असे एकूण ३९ हजार ५०९ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

४३ हजार ६८४ हेक्टरवर कपाशीची लागवड नियोजित

जिल्ह्यात यंदा कपाशीची ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड नियोजित आहे. त्यासाठी २ लाख १८ हजार ४२० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यापैकी सार्वजनिक कंपन्यांकडून १७५ आणि खासगी कंपन्यांकडून १ लाख ३४ हजार ४०८ पाकिटे, अशी एकूण १ लाख ३५ हजार ६८३ पाकिटे उपलब्ध झाली. त्यापैकी ४० हजार ६७२ बियाणे पाकिटांची विक्री झाली. आणखी ९४ हजार ९११ पाकिटे शिल्लक आहेत, असे डुबल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com