नगर शहरात भाजीपाला, फळे विक्रीला बंदी

पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाउन नंतर नगरमध्ये फळे, भाजीपाला विक्रीची दिलेली परवानगी एक दिवसात मागे घेण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने पुन्हा पंधरा दिवसांसाठी कडक लॉकडाउन केले आहे.
The sale of vegetables and fruits is banned in the city
The sale of vegetables and fruits is banned in the city

नगर ः पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाउन नंतर नगरमध्ये फळे, भाजीपाला विक्रीची दिलेली परवानगी एक दिवसात मागे घेण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने पुन्हा पंधरा दिवसांसाठी कडक लॉकडाउन केले आहे. त्यात भाजीपाला, फळांसह चिकन, मटन, अंडी विक्रीला बंदी घातली आहे. महापालिका आयुक्तांच्या या आदेशाने शेतकरी, सामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नगरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी कडक लॉकडाउन करण्यात आले होते. दूध आणि आरोग्य विभाग वगळता सर्व बाबीची खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली होती. या आदेशाने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. दोन वेळा आदेश काढल्यानंतर १५ मे रोजी त्यात शिथिलता करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असलेले नागरिक व व्यापारी, शेतकरी वर्गाला काहीसा दिला मिळाला होता. मात्र, एक दिवसातच पुन्हा हा आदेश बदलण्यात आला आहे.

नगरमध्ये सोमवार (ता. १७) पासून पुन्हा १ जूनपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यात भाजीपाला, फळांसह चिकन, मटन, अंडी विक्रीला बंदी घातली आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. आयुक्तांच्या या आदेशाने शेतकरी, सामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. नव्या आदेशानुसार वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप, घरपोच गॅस वितरण सेवा, सर्व बॅंका पिठाची गिरणी सुरू राहणार असून सकाळी सात ते अकरापर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री व पशुखाद्य विक्री, बी-बियाणे, खते व कीटकनाशके दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे. कृषी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी करण्यात आलेली सायंकाळी चार वाजेपर्यंतची वेळ कमी करून सकाळी अकरा पर्यंतच ठेवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com