सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून रस्त्यावरच भाजीविक्री

Sale of vegetables on the street from authorized vendors in Satara Market Committee premises
Sale of vegetables on the street from authorized vendors in Satara Market Committee premises

सातारा : बाजार समितीच्या आवारातील शेतकऱ्यांच्या भाजी मंडईच्या बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांवरून संबंधित भाजी मंडईचा वाद पुन्हा चिघळला आहे. यासंदर्भात अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांनी सोमवारी (ता.१७) रस्त्यावरच भाजी विक्री करण्याचे आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूक कोंडी व शेतकऱ्यांच्या सोईबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक झाले आहे. 

काही वर्षांपूर्वी रविवार पेठ भाजी मंडईत शेतकरी विक्रेते व किरकोळ विक्रेते एकत्रित भाजी विक्रीसाठी बसायचे. परंतु, विक्रेत्यांमुळे बसायला जागा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतंत्र जागेची मागणी केली. शेतकरी संघटनेद्वारे त्यासाठी वेळावेळी आंदोलने झाली. त्यामुळे मुख्य बस स्थानकाजवळ बाजार समितीच्या मोकळ्या जागेमध्ये सकाळी सहा ते नऊ या कालावधीत शेतकऱ्यांसाठी किरकोळ भाजी विक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली.

याही ठिकाणी कालांतराने किरकोळ विक्रेत्यांनीही शिरकाव केला. त्यामुळे शेतकरी व विक्रेत्यांमध्ये संघर्ष पेटला होता. त्या वेळी शेतकरी संघटनेच्या भूमिकेनुसार शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीने विचार करून किरकोळ विक्री सुरू झाली. 

गेली काही वर्षे त्या ठिकाणी शेतकरी दररोज सकाळी भाजी विक्री करत आहेत. भाजी खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे मंडईतील विक्रेत्यांवर परिणाम होतो. परंतु, तरीही काही वर्षांपूर्वीचा हा वाद गेल्या काही दिवसांमध्ये क्षमला होता. आता मात्र, शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीने दिलेल्या जागेच्या समोर पदपथावरही विक्रेत्यांची गर्दी होत आहे. 

अनधिकृत विक्रेत्यांची वाढलेली संख्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या विक्रेत्यांनी सोमवारी या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या मंडईसमोरच रस्त्यावर भाजी विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्य बस स्थानक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com