सहा जिल्ह्यांत महाबीजचे २२ हजार क्विंटल बियाणे विक्री

सहा जिल्ह्यांत महाबीजचे २२ हजार क्विंटल बियाणे विक्री
सहा जिल्ह्यांत महाबीजचे २२ हजार क्विंटल बियाणे विक्री

परभणी ः यंदाच्या रब्बी हंगामात महाबीजच्या परभणी विभागाअंतर्गंतच्या सहा जिल्ह्यांमध्ये ज्वारी, हरभरा, करडई, गहू या पिकांचे मिळून एकूण २२ हजार ८३९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी ठप्प आहे. परंतु ओलिताची सुविधा असलेले शेतकरी पेरणी करत आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पेरणी शक्य नसल्यामुळे बियाणाची विक्री संथगतीने सुरू आहे. पेरणीअभावी बियाणे शिल्लक राहणार आहेत.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये हरभरा, ज्वारी, गहू, करडईचे मिळून एकूण ५७ हजार ९२० क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. त्यापैकी २२ हजार ८३९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, ३५ हजार ८१ क्विंटल बियाणे शिल्लक होते.

महाबीजच्या परभणी विभागात यंदा हरभऱ्यांचे ७२ हजार ६५९ क्विंटल बियाणे पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.त्यामध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमासाठी ३२ हजार ७६० क्विंटल, पीक प्रात्यक्षिकांसाठी २ हजार २९९ क्विंटल, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यासाठी ३७ हजार ६०० क्विंटल एवढ्या बियाण्यांचा समावेश आहे. उद्दिष्टापैकी ६५ हजार ६३५ क्विंटल बियाणेसाठा मंजूर झाला आहे. एकूण ४५ हजार ८२९ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. आजवर १८ हजार ४७६ क्विंटल बियाण्यांची विक्री असून, २७ हजार ३५७ क्विंटल बियाणे शिल्लक आहेत.

गव्हाच्या एकूण १२ हजार ६६० क्विंटल बियाणे पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५ हजार ४९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. आजवर १ हजार ४०० क्विंटल बियाणाची विक्री झाली असून, ४ हजार ९१ क्विंटल बियाणे शिल्लक होते. करडईचे ३१२ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. त्यापैकी १०४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, २०८ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. ज्वारीचे ६ हजार २८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ८५९ क्विंटल बियाणाची विक्री झाली असून, ३ हजार ४२९ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

यंदा बियाणे विक्री संथगतीने होत आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी १० नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करू शकतात. त्यामुळे बियाण्यांची विक्री होईल. - एस. पी. गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com