दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
परभणी विभागात २८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री
परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये यंदा सोमवार (ता. १८) पर्यंत गव्हाचे ५ हजार ७२३ क्विंटल आणि हरभऱ्याचे ३६ हजार ३८३ क्विंटल असे गहू आणि हरभरा मिळून एकूण ४२ हजार १०७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पानदन योजना अनुदानावरील १३ हजार ८५५ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. यापैकी २८ हजार क्विंटल बियांची विक्री याबाबत महाबीजच्या सूत्रांनी माहिती दिली.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा परभणी विभागात गव्हाच्या ४ हजार ६३ क्विंटल आणि हरभऱ्याच्या २६ हजार ६२४ क्विंटल एवढा बियाणेसाठा मंजूर करण्यात आला. परंतु, सोमवार (ता. १८) पर्यंत गव्हाचे ५ हजार ७२३ क्विंटल आणि हरभऱ्याचे ३६ हजार ३८३ क्विंटल एवढा बियाणेपुरवठा करण्यात आला.
गव्हाच्या २ हजार ९८५ क्विंटल आणि हरभऱ्याच्या २५ हजार ७३ क्विंटल मिळून एकूण २८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाणे वाणानुसार प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये अनुदानावर उपलब्ध आहे. गहू बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान आहे. त्यासाठी शेकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्डची प्रत देऊन बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गव्हाचे ३९० आणि हरभऱ्याचे ५ हजार ५०९ क्विंटल असे एकूण ५ हजार ८९९ क्विंटल आणि ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत गव्हाचे २ हजार ४७१ क्विंटल आणि हरभऱ्याचे ५ हजार ५१५ क्विंटल, असे एकूण ७ हजार ९८६ क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी अनुदानावरील अन्नसुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पादन योजना मिळून एकूण १३ हजार ८५५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे महाबीजच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्हानिहाय बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)
जिल्हा | गहू | हरभरा |
परभणी | १८८५ | ६०३८ |
हिंगोली | ३६९ | २७५९ |
नांदेड | ५२८ | ७८७३ |
लातूर | ३०० | ९९९६ |
उस्मानाबाद | ५५५ | ७५०६ |
सोलापूर | २०८६ | २१४९ |
- 1 of 1030
- ››