यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री

यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री

यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याअंतर्गत नामांकन अर्ज घेण्याच्या पहिल्याच्या दिवशी विक्रमी ३०० अर्जांची विक्री झाली. यातील दोघांकडून तीन नामांकनही दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सहकार कायद्यातील विविध तरतुदींचा आधार घेत जिल्हा बॅंकेची निवडणूक तब्बल १२ वर्षे पुढे रेटण्यात आली. त्यानंतर आता १२ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमरावती विभागीय सहनिबंधकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची विक्री आणि नामांकन स्वीकृतीला सुरुवात झाली. नामांकन अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी ३०० अर्ज विकल्या गेले. त्यावरूनच जिल्हा बॅंकेचे राजकीय रणकंदन चांगलेच गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  अर्ज विक्री आणि स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी राजेश अग्रवाल यांनी दोन तर छाया मॅडमवार यांनी एक नामांकन दाखल केले. नामांकन अर्जाची किंमत १०० रुपये आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये तर इतर प्रवर्गातील उमेदवाराला २००० रुपये अनामत रक्‍कम भरण्याची अट आहे. तालुका गटात ५९५ तर जिल्हा गटातील १०२५ एवढी मतदारांची संख्या आहे. जिल्हा व तालुका गटातील मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत. विधानसभा व विधान परिषदेनंतर पुन्हा राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. नामांकन दाखल करण्याची शनिवार (ता.२९) पर्यंत मुदत असून इच्छुकांची गर्दी झाल्याने संभावीत बंडखोरी रोखण्याचे आवाहन सर्वच प्रमुख पक्ष नेत्यांसमोर असणार आहे. थकबाकीदार अपात्र थकबाकीदार असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नाही. नियमित कर्जदार असलेल्या व्यक्‍तीला निवडणूक लढता येईल. त्यामुळे बॅंक, पतसंस्थेचा थकबाकीदार असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. इच्छुकांमध्ये थकबाकीदारांची संख्या मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com