Agriculture news in marathi Sales of 300 applications for Yavatmal District Bank | Agrowon

यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३०० अर्जांची विक्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याअंतर्गत नामांकन अर्ज घेण्याच्या पहिल्याच्या दिवशी विक्रमी ३०० अर्जांची विक्री झाली. यातील दोघांकडून तीन नामांकनही दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याअंतर्गत नामांकन अर्ज घेण्याच्या पहिल्याच्या दिवशी विक्रमी ३०० अर्जांची विक्री झाली. यातील दोघांकडून तीन नामांकनही दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सहकार कायद्यातील विविध तरतुदींचा आधार घेत जिल्हा बॅंकेची निवडणूक तब्बल १२ वर्षे पुढे रेटण्यात आली. त्यानंतर आता १२ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमरावती विभागीय सहनिबंधकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची विक्री आणि नामांकन स्वीकृतीला सुरुवात झाली. नामांकन अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी ३०० अर्ज विकल्या गेले. त्यावरूनच जिल्हा बॅंकेचे राजकीय रणकंदन चांगलेच गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

अर्ज विक्री आणि स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी राजेश अग्रवाल यांनी दोन तर छाया मॅडमवार यांनी एक नामांकन दाखल केले. नामांकन अर्जाची किंमत १०० रुपये आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये तर इतर प्रवर्गातील उमेदवाराला २००० रुपये अनामत रक्‍कम भरण्याची अट आहे. तालुका गटात ५९५ तर जिल्हा गटातील १०२५ एवढी मतदारांची संख्या आहे. जिल्हा व तालुका गटातील मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत.

विधानसभा व विधान परिषदेनंतर पुन्हा राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. नामांकन दाखल करण्याची शनिवार (ता.२९) पर्यंत मुदत असून इच्छुकांची गर्दी झाल्याने संभावीत बंडखोरी रोखण्याचे आवाहन सर्वच प्रमुख पक्ष नेत्यांसमोर असणार आहे.

थकबाकीदार अपात्र
थकबाकीदार असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नाही. नियमित कर्जदार असलेल्या व्यक्‍तीला निवडणूक लढता येईल. त्यामुळे बॅंक, पतसंस्थेचा थकबाकीदार असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. इच्छुकांमध्ये थकबाकीदारांची संख्या मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर बातम्या
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...