सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची विक्री

जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील ठप्प झालेला बाजार, शेतमाल विक्रीसंबंधीच्या अडचणी यात अडकून न राहता म्हसावद (ता. जळगाव) येथील चव्हाण पिता-पुत्रांनी आपल्या ढोबळ्या मिरचीची विक्री सोशल मीडियाच्या मदतीने जळगाव शहरात घरोघरी विक्रीचा प्रयत्न राबविला आहे.
Sales of chilli peppers with the help of social media
Sales of chilli peppers with the help of social media

जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील ठप्प झालेला बाजार, शेतमाल विक्रीसंबंधीच्या अडचणी यात अडकून न राहता म्हसावद (ता. जळगाव) येथील चव्हाण पिता-पुत्रांनी आपल्या ढोबळ्या मिरचीची विक्री सोशल मीडियाच्या मदतीने जळगाव शहरात घरोघरी विक्रीचा प्रयत्न राबविला आहे. 

सुरेश चव्हाण यांनी म्हसावद येथील अर्ध्या एकरात पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. त्यांना पुत्र शैलेंद्र यांची मदत मिळते. रंगीत ढोबळी मिरचीला सूरत (गुजरात) येथे चांगला बाजार मिळतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पाठवणूक, मागणी ठप्प झाली. सुमारे तीन मेट्रिक टन मिरची काढणीला होती. तिला १२० ते १३० रुपये प्रतिकिलोचा दर तेथील बाजारात मिळणे अपेक्षित होते. परंतु परराज्यातील बाजारात मिरचीची विक्री ठप्प झाल्याने शैलेंद्र यांनी आपला परिचय, उपक्रमशीलता यातून विविध व्हॉट्‌सअॅप ग्रुप व इतर माध्यमांमध्ये ढोबळी मिरचीचे आरोग्याला होणारे फायदे सांगितले. 

तसेच ग्राहकांना हवी असल्यास ढोबळी मिरची घरपोच केली जाईल, असे सांगितले. यानंतर मिरचीची मागणी नोंदविणे सुरू झाले. तीन क्विंटल १८ किलो ढोबळ्या मिरचीची विक्री शेलेंद्र यांनी एका सहकाऱ्यांच्या मदतीने जळगाव शहरातील गणपतीनगर, गुजराल पेट्रोल पंप, बळिराम पेठ व इतर भागात ग्राहकांना विक्री केली. आपल्या चारचाकी वाहनाद्वारे ही मिरची घरोघरी पोचविली. ४० रुपये प्रतिकिलो दर आकारला. ग्राहकांनाही दर्जेदार मिरची मिळाल्याने समाधान मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातूून मिरचीची मागणी सुरू आहे. त्याचा आता रोज पुरवठा केला जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com