विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्री

नागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पुरवठा कमी असल्याचे कारण सांगत कृषी व्यावसायिकांनी त्यांच्याकडील साठ्याची जादा दराने विक्री चालविल्याने शेतकऱ्यांच्या समोर संकट अधिकच गडद झाले आहे.
Sales at extra rate due to shortage of fertilizer in Vidarbha
Sales at extra rate due to shortage of fertilizer in Vidarbha

नागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पुरवठा कमी असल्याचे कारण सांगत कृषी व्यावसायिकांनी त्यांच्याकडील साठ्याची जादा दराने विक्री चालविल्याने शेतकऱ्यांच्या समोर संकट अधिकच गडद झाले आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ अशा सर्वच ११ जिल्ह्यांमध्ये युरियाची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना उपलब्धतेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमरावती जिल्ह्यात सर्व प्रकारची १०६३ खताची उपलब्धता आहे त्यामध्ये युरिया केवळ ३५२५ असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात ३० हजार ३२० टन युरिया खताचे आवंटन मंजूर आहे. त्यापैकी १४ हजार ३९५ युरियाचा साठा जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच दहा हजार ८५० टन खताची विक्री झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३५४५ टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

येत्या दोन दिवसांत १३०० टन खताचा पुरवठा होणार असल्याचेही सांगण्यात आले. अकोला येथील रेक पॉइंटवरून अमरावती जिल्ह्याला ३६० टन खताचा पुरवठा दोन दिवसांपूर्वी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात धान रोवणीला वेग आला आहे.  रोवणीच्यावेळी युरियाची गरज राहते. परंतु या जिल्ह्यातही युरियाचा पुरवठा अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टंचाईआड २६६ रुपये किंमत असलेली बॅग शेतकऱ्यांना तीनशे ते साडेतीनशे रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे.

या संदर्भाने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील खत उत्पादक कंपन्यांची संपर्क साधला. कंपन्यांनी लवकरच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. परंतु अद्यापही पुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पेरणीनंतर आमच्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना युरियाची गरज होती. परंतु अनेक कृषी सेवा केंद्रधारकांनी युरिया नसल्याचे सांगत परत पाठवले आहे. - संजय सत्यकार, शेतकरी, कन्हान, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com