येवल्यात द्राक्षांची 'उत्पादक ते ग्राहक विक्री सुरू

सध्या मागणी नसल्याने अडचणी आहेत. त्यामुळे रस्त्यावर विकण्याची वेळ आली. मात्र, त्यातून काही वेगळे होईल, असे नाही. द्राक्षे पडून राहण्यापेक्षा माणसाच्या मुखात घालून आनंद मिळवितोय. मात्र दुःख शब्दात सांगू शकत नाही. - सुनील जाधव, द्राक्ष उत्पादक,जऊळके, ता.येवला चालू वर्षी पहिला दीड एकरचा प्लॉट व्यापाऱ्यांतर्फे विक्री केला. मात्र, नंतरच्या दीड एकर प्लॉटची काढणी लॉक डाऊनमुळे झाली नाही. त्यामुळे अडचण उभी राहिली. मात्र, नंतर थेट उत्पादक ते ग्राहक संकल्पना राबवून माल विकला जात असल्याने दिलासा मिळाला आहे. विक्री करताना मास्क लावल्याशिवाय द्राक्ष दिले जात नाहीत. हा नियम कडक अमलात आणला आहे. - किरण लभडे, द्राक्ष उत्पादक,निमगाव मढ, ता.येवला
sales of grape direct growers to customers in Yevala
sales of grape direct growers to customers in Yevala

नाशिक : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष काढणीस आले असताना व्यापारी वर्ग मिळत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थीतीत येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक उत्पादक ते ग्राहक या पद्धतीने विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

लॉकडाऊनमुळे शेतमाल शेतातच पडून आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान द्राक्ष उत्पादकांचे होत आहे. मात्र, अशा परिस्थितीत द्राक्ष काढणी करून ट्रॅक्टर व जीपमधून त्यांची येवला शहरासह अंदरसुल, नगरसुल, उंदिरवाडी, नागडे, चिचोंडी या गावांमध्ये थेट विक्री केली जात आहे. दररोज एक टनापर्यंत द्राक्षे विकली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

द्राक्षाला प्रतिकिलो ३०, तर दोन किलोला ५० रुपये असा दर मिळत आहे. यावर्षी कुठलाही नफा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र झालेला खर्च थोड्याफार प्रमाणात वसूल होईल, असे चित्र आहे.    ‘सोशल डिस्टसिंग’सह विशेष खबरदारी  

विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग पाळून द्राक्ष विक्रीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकाच्या तोंडावर कापड किंवा मास्क नसल्यास माल दिला जात नाही. तर, शेतकरी मास्क, हातमोजे घालून मानव स्पर्शविरहित विक्रीला प्राधान्य देत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com