Agriculture news in marathi Sales of vegetables directly from farmers to consumers in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

नांदेड ः जिल्ह्यात शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला फळे विक्री या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज ९० ते १०० क्विंटल भाजीपाला आणि सुमारे १५० क्विंटल टरबूज आणि इतर फळांची विक्री होत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गाव ते शहर अशी विपणन साखळी तयार करण्यात आली, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

नांदेड ः जिल्ह्यात शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला फळे विक्री या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज ९० ते १०० क्विंटल भाजीपाला आणि सुमारे १५० क्विंटल टरबूज आणि इतर फळांची विक्री होत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गाव ते शहर अशी विपणन साखळी तयार करण्यात आली, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील फळे भाजीपाला उत्पादकांना विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. या परिस्थितीत शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग, आत्मा यांच्यातर्फे मदत करण्यात येत आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक रवीशंकर चलवदे यांच्या अध्यक्षतेखाली आत्माचे उपसंचालक एम. के. सोनटक्के, तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी, संगणक परिचालक श्रीहरी बिरादार यांचा जिल्हास्तरीय कार्यक्रमगट स्थापन केला आहे. भाजीपाला -फळे उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रीतसर वाहतूक परवाना मिळवून दिला जात आहे. 
ग्राहकांकडील फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेतली जात आहे. 

क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविल्या जात आहेत. वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना विक्रीची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. तालुका, जिल्हा, नगरपालिका, महानगरपालिका आदी क्षेत्रातून जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

काशिफळांची थेट शेतातून विक्री 
नांदेड जिल्ह्यातील हदगाव, बिलोली, भोकर, कंधार, नायगाव, देगलूर, नांदेड, माहूर, किनवट, लोहा मुखेड, मुदखेड यासह सर्वच तालुक्यातील शेतकरी तसेच शेतकरी गटांकडून भाजीपाला फळांची विक्री केली आहे. कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर येथील शेतकरी शिवराज बाबुराव कोटे यांनी संपर्क केल्यानंतर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी अवतारसिंग परिहार यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. ११) गुरुद्वारा बोर्ड येथील लंगरसाठी एक हजार किलो काशिफळांची थेट शेतातून विक्री करण्यात आली. 

अशी तयार केली साखळी 
तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गावस्तरावर कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक, कृषी मित्र यांच्या सहकार्याने विपणन साखळी ही साखळी तयार केली असून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह संपूर्ण काळजी घेत आहेत. गाव ते शहर विपणन साखळी तयार करण्यात आल्यामुळे येत्या काळात नागरिकांना भाजीपाला, फळांची कमतरता भासणार नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...