Agriculture news in Marathi Salivary gland disease killed 103 animals | Agrowon

लाळ्या खुरकूत आजाराने १०३ जनावरे दगावली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या लाळ्या खुरकूत, घटसर्प रोगांच्या प्रादुर्भावाने जनावरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सात गावांत सुमारे १०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

नगर ः नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या लाळ्या खुरकूत, घटसर्प रोगांच्या प्रादुर्भावाने जनावरांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सात गावांत सुमारे १०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून आतापर्यंत सुमारे ५ हजार ५६३ जनावरांना लाळ्या खुरकूत, घटसर्पाचे लसीकरण केले आहे. मृत जनावरांत बहुतांश जनावरे संकरित व  दुभती असल्याने मोठा आर्थिक फटका बसत असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत्ती, कुकाना, नांदुर शिकारी, भेंडा (खुर्द व बुद्रुक) देवगाव आदी गावांत लाळ्या खुरकुताच्या साथीने जनावरांचा मृत्यू होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे १०३ जनावरे यात दगावली आहेत. त्यात देशी गाई पाच व २ खिलार वगळता इतर ९६ जनावरे संकरित (एचएफ) आहेत. या आजाराने दोनपेक्षा अधिक जनावरे बाधित झाली आहेत.

जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंबारे यांच्या पथकाने या भागात तातडीने लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत साथ उद्‍भवलेल्या गावांतील ५ हजार ५६३ जनावरांना लाळ्या खुरकूत, घटसर्पाचे लसीकरण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे दूध व्यवसाय अडचणीत आहे. शेतीलाही अनेक संकटाला सामोरे जावे लागत असताना लाळ्या खुरकूत, घटसर्पाच्या साथीने अचानक जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याने शेतकरी, पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

गावनिहाय मृत जनावरे
जेऊर हैबत्ती ः ५०, कुकाणा ः ५, भेंडा बुद्रुक ः ८, भेंडा खुर्द ः २३, नांदूर शिकारी ः ६, तरवडी ः ६, देवगाव ः ५


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...