लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार जनावरे, १२ शेळ्या दगावल्या

मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या खुरकूत साथ पसरली आहे. यामुळे चार जनावरे व दहा-बारा शेळ्या दगावल्या आहेत.
Salivary glands due to scabies Four animals, 12 goats were slaughtered
Salivary glands due to scabies Four animals, 12 goats were slaughtered

आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या खुरकूत साथ पसरली आहे. यामुळे चार जनावरे व दहा-बारा शेळ्या दगावल्या आहेत. पशुधन विभागाच्या पथकाने सर्वेक्षण सुरू केले असून, आजारी जनावरांची तपासणीही सुरू केली आहे. आठ-दहा दिवसांपासून गावात लाळ्या खुरकूत साथ पसरली आहे. या साथीचा प्रसार वेगाने झाला आहे. यामुळे चार म्हशी, पाच रेडके व वीस शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. दयानंद बुगडे, दयानंद कागीनकर, धनाजी सावंत यांच्या तीन म्हशीचा मृत्यू झाला आहे. मारुती साळुंखे, कृष्णा पारदे, लीलाबाई निकम, ताराबाई शेळके, तुकाराम बुगडे, यशवंत कागीनकर, जगदीश कागीनकर यांच्या सुमारे २० बकऱ्यांचा मृत्यू झाला. आजऱ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे म्हणाले, ‘‘लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाबाबत पशुपालकांना आवाहन केले होते. अनेकदा गैरसमजुतीने पशुपालकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. ज्या जनावरांचे लसीकरण झालेलेले नाही त्यांना बाधा झाली आहे. सध्य गळीत हंगाम जोरात आहे. त्याचबरोबर कोरोनानंतर जनावरांचे बाजार खुले झाल्याने कर्नाटकातून जनावरांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. अनेकदा बाहेरून आलेल्या जनावरांकडून साथ पसरते.  बकऱ्याचे लाळ्या खुरकूतचे लसीकरण दर वर्षी केले जाते. पण यंदा लस उपलब्ध झाली नसल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्याकडून लसीबाबत गैरसमज असल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com