वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत लसीकरण  मोहीम अखेर सुरू 

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या लाळ्या खुरकूत लसीकण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मागणी केलेल्या लसींचा पुरवठा झाल्यानंतर पुणे जिल्हासाठी १० लाख ३० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत.
लाळ्या खुरकूत लसीकरण  मोहीम अखेर सुरू  Salivary itch vaccination The campaign finally started
लाळ्या खुरकूत लसीकरण  मोहीम अखेर सुरू  Salivary itch vaccination The campaign finally started

वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या लाळ्या खुरकूत लसीकण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मागणी केलेल्या लसींचा पुरवठा झाल्यानंतर पुणे जिल्हासाठी १० लाख ३० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. शेतकरी व पशुपालकांनी पशुधनाला लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.   लासुर्णे (ता. इंदापूर) येथील देवकाते वस्तीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब सपकळ, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, उपसरपंच उल्हास जाचक, ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण, निखील भोसले, विशाल घोरपडे, तुकाराम देवकाते, मोहन कोकरे उपस्थित होते.  भरणे म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करीत आहेत. सध्या तालुक्यामध्ये लाळ्या खुरकूत रोगाची जनावरे आढळू लागली आहेत. या रोगामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांसाठी नाममात्र एक रुपये दरामध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली असून, शेतकऱ्यांनी लसीकरणाला सहकार्य करून जनावरांना लस द्यावी. इंदापूर तालुक्यामध्ये १ लाख ७० हजार ४६४ मोठी जनावरे असून, तालुक्यासाठी १ लाख ५८ लस उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील २७ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून २१ दिवसांमध्ये लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान टळणार आहे.’’ या वेळी पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, डॉ. भीमराव जानकर, डॉ. संजय पराडे, डॉ. अभिजित आटोळे, हनुमंत हेंद्रे, सुनील शिंदे, संजय येवले, ग्रामसेवक पी. के. घोगरे उपस्थित होते.  फिरते पशुचिकित्सालय  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फिरते पशुचिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन खात्याच्या योजना थेट शेतकऱ्याच्या गोठ्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी १९६२ या टोल फ्री नंबर संपर्क साधण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com