Agriculture News in Marathi Salivary itch vaccination The campaign finally started | Page 3 ||| Agrowon

वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत लसीकरण  मोहीम अखेर सुरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या लाळ्या खुरकूत लसीकण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मागणी केलेल्या लसींचा पुरवठा झाल्यानंतर पुणे जिल्हासाठी १० लाख ३० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत.

वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या लाळ्या खुरकूत लसीकण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मागणी केलेल्या लसींचा पुरवठा झाल्यानंतर पुणे जिल्हासाठी १० लाख ३० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. शेतकरी व पशुपालकांनी पशुधनाला लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. 

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील देवकाते वस्तीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब सपकळ, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, उपसरपंच उल्हास जाचक, ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण, निखील भोसले, विशाल घोरपडे, तुकाराम देवकाते, मोहन कोकरे उपस्थित होते. 

भरणे म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करीत आहेत. सध्या तालुक्यामध्ये लाळ्या खुरकूत रोगाची जनावरे आढळू लागली आहेत. या रोगामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांसाठी नाममात्र एक रुपये दरामध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली असून, शेतकऱ्यांनी लसीकरणाला सहकार्य करून जनावरांना लस द्यावी. इंदापूर तालुक्यामध्ये १ लाख ७० हजार ४६४ मोठी जनावरे असून, तालुक्यासाठी १ लाख ५८ लस उपलब्ध झाली आहे.

तालुक्यातील २७ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून २१ दिवसांमध्ये लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान टळणार आहे.’’ या वेळी पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, डॉ. भीमराव जानकर, डॉ. संजय पराडे, डॉ. अभिजित आटोळे, हनुमंत हेंद्रे, सुनील शिंदे, संजय येवले, ग्रामसेवक पी. के. घोगरे उपस्थित होते. 

फिरते पशुचिकित्सालय 
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फिरते पशुचिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन खात्याच्या योजना थेट शेतकऱ्याच्या गोठ्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी १९६२ या टोल फ्री नंबर संपर्क साधण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले. 


इतर बातम्या
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...