शेती प्रश्नांसाठी २४ ला समरजितसिह घाटगे यांचे उपोषण 

सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून २४ ला लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
शेती प्रश्नांसाठी २४ ला  समरजितसिह घाटगे यांचे उपोषण Samarjit Singh Ghatge's fast on 24th for agricultural issues 
शेती प्रश्नांसाठी २४ ला  समरजितसिह घाटगे यांचे उपोषण Samarjit Singh Ghatge's fast on 24th for agricultural issues 

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफी, कर्जफेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची आणि कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने गेल्या वर्षी केली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून २४ ला लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती समरजितसिंह घाटगे यांनी दिली. या बाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, ‘‘सरकारने गेल्यावर्षी शेतकरी आणि सामान्य जनतेला आश्‍वासने दिली होती, मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. ना शेतकऱ्यांची कृषीपंपाची वीजबिल माफी झाली. ना प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये मिळाले.

कोरोना पार्श्‍वभूमीवर उद्योजकांची वीजबिल माफीदेखील झाली नाही. सरकारने आश्‍वासने पूर्ण न केल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. याचा निषेध म्हणून दसरा चौकातून एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com