agriculture news in Marathi, Sampada Mehta new marketing federation commissioner, Maharashtra | Agrowon

पणन आयुक्तपदी संपदा मेहता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई ः राज्यातील तूर, हरभरा आदी शेतीमालाच्या शासकीय खरेदीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी (ता. १६) पणन आयुक्तपदी मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे पणन मंडळ, पणन महासंघ आणि ग्राहक महासंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबईत त्यांचे कार्यालय राहील. राज्य सरकारने सोमवारी तब्बल २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

मुंबई ः राज्यातील तूर, हरभरा आदी शेतीमालाच्या शासकीय खरेदीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी (ता. १६) पणन आयुक्तपदी मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे पणन मंडळ, पणन महासंघ आणि ग्राहक महासंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबईत त्यांचे कार्यालय राहील. राज्य सरकारने सोमवारी तब्बल २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

नगरचे महापालिका आयुक्त जी. सी. मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे मुंबईत महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अहमदनगरचे महापालिका आयुक्त जी. सी. मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे, तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी ए. एम. महाजन यांना पाणीपुरवठा विभागात उपसचिव करण्यात आले आहे. 

जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे यांना मुंबई जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, संजय यादव यांची एमएमआरडीएमधून थेट अकोल्याच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आता पुणे जिल्हाधिकारी असतील, तर नवलकिशोर यांच्या जागी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगर जिल्हाधिकारीपदी बदली नाकारण्यात अाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेत आणण्यात आले असून, त्यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...