agriculture news in Marathi samrudhhi will be open in 2022 Maharashtra | Page 3 ||| Agrowon

`समृद्धी` २०२२ मध्ये खुला होणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात १९ कृषी समृद्धी केंद्रांचा (नवनगरे) विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १९ पैकी ८ कृषी समृद्धी केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुंबई: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात १९ कृषी समृद्धी केंद्रांचा (नवनगरे) विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १९ पैकी ८ कृषी समृद्धी केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षी जूनपासून ८ पैकी ६ केंद्रांची जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यांच्या विकासाला सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. 

तसेच सध्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात सुरु असून १ मे २०२२ पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबई ते नागपूर ७०१ कि.मी.चा समृद्धी महामार्ग बांधणीचे काम वेगात सुरु आहे. या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील पहिला ५०० कि.मी.चा नागपूर ते शिर्डी हा टप्पा येत्या मे महिन्यात होणार आहे. तर संपूर्ण मार्ग मे २०२२ पर्यंत सुरु होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना आता ‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पातील कृषी समृद्धी केंद्रांच्या कामाला वेग दिला आहे.

या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. तर या मार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठीच १९ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सिडकोप्रमाणे ‘एमएसआरडीसी’ नियोजन प्राधिकरण म्हणून १९ केंद्रांचा विकास करणार आहे. 

टाऊनशिपसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या जमिनीवर शाळा, रस्ते, गार्डन, समाज मंदिर, वीज, पाणी, निवासी-व्यावसायिक जागा अशा बाबी विकसित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील विरुल आणि केलझार, बुलडाण्यातील सावरगाव, मेहकर, औरंगाबादमधील हडस पिंपळगाव, घाईगव, बबतारा आणि ठाण्यातील फुलगाळे या ८ केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

या १९ कृषी समृद्धी केंद्रांमुळे समृद्धी महामार्गालगतच्या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. हा परिसर कृषी आणि उद्योग हब बनणार असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

सहा केंद्रांसाठी भू-संपादन सुरु
पहिल्या टप्प्यातील ८ केंद्रांपैकी ६ केंद्रांसाठी जमीन संपादनाचे काम सुरु आहे. याबाबत शेतकऱ्यांशी बोलणी-चर्चा सुरु आहे. त्यांना योग्य आणि चांगला मोबदला देण्यात येत आहे. तर शेतकरीही या प्रकल्पाला होकार देत आहेत. ६० ते ७० टक्के जमीन संपादन लवकरच होण्याची शक्यता आहे. १०० टक्के संपादन जून २०२१मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची संमती, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

   समृद्धी महामार्ग दृष्टिक्षेपात

  • ७०१ किलो मीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग 
  • दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार
  • नागपूर आणि मुंबई अंतर ८ तासांत पूर्ण करता येणार
  • महामार्गावर १९ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारणार
  • ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित

पहिल्या टप्प्यातील कृषी समृद्धी केंद्रे
विरुलः
वर्धा
केलझारः वर्धा
सावरगावः बुलडाणा
मेहकरः बुलडाणा
हडस पिंपळगावः औरंगाबाद
घाईगावः औरंगाबाद
बबताराः औरंगाबाद
फुलगाळेः ठाणे

दुसऱ्या टप्प्यातील कृषी समृद्धी केंद्रे
हिंगणाः
नागपूर
धामणगावः अमरावती 
नांदगावः अमरावती
कारंजाः वाशीम
मंगळूरपीरः वाशीम
मालेगावः वाशीम
जामवाडीः जालना
सावली विहारः नगर
कासगावः ठाणे
लेनाडः ठाणे
मौजे चिंचवली: ठाणे


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...