देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान ः खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या निर्णयांमुळे उद्योग क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. मोठ्या उद्योगांना याचा फटका बसला आहे. तंत्रज्ञानास आपला विरोध नाहीच, मात्र नवीन संकल्पना राबवताना आर्थिक क्षेत्रावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घ्यावेच लागतात. नोटाबंदीनंतर देखील भ्रष्टाचार कमी झालेला नाही. हे देशाच्या अर्थमंत्र्यांचे अधिकृत विधान आहे. आर्थिक नीती आणि धोरण दिशाहीन असल्यानेच सध्या बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. सत्तेत बदल करण्यासाठी आवाज उठवणारच, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू आहे. त्याला जोडूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्याही संवाद यात्रेचे आयोजन ‘राष्ट्रवादी’च्या वतीने करण्यात आले आहे. सुळे यांची संवाद यात्रा राज्यातील प्रमुख शहरांमधून जाणार आहे. नगर शहरातून शुक्रवारी सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेस प्रारंभ झाला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या निर्मला मालपाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या मंजूषा गुंड, किसनराव लोटके आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र उद्योगधंद्याच्या बाबतीत देशात आघाडीवर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याकडे लक्ष वेधले असता, खासदार सुळे म्हणाल्या, की तसे असेल तर राज्य प्रगतिपथावर गेल्यामुळे मी निश्‍चितच स्वागत करील. मात्र मुख्यमंत्र्यांचा दावा आणि आकडेवारी याचा ताळमेळ जुळत नाही. केवळ निवडणुका जिंकत आहेत, म्हणून कोणाचा कारभार चांगला ठरवता येत नाही. शेतकरी कर्जमाफी व पीक विमा योजनेत हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com