भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. शनिवार (ता. ३१) पूर्वी धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश संबंधित खरेदीदार संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Sanction for 79 grain procurement centers in Bhandara
Sanction for 79 grain procurement centers in Bhandara

भंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. शनिवार (ता. ३१) पूर्वी धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश संबंधित खरेदीदार संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

धान्याचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख यावर्षी जिल्ह्यात १ लाख ५८ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर धानाची लागवड  होती. गेल्या पंधरा दिवसांपासून धान काढणी आणि मळणी होऊन शेतकऱ्याच्या घरी आले आहे. मात्र, आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने व्यापाऱ्यांना कमी दरात धान्य विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची होरपळ लक्षात घेता धान खरेदी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

शासन पातळीवर देखील त्यांनी या संदर्भाने अनेकदा बैठका घेतल्या. त्याची दखल घेत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या निधीसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. त्यावर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी खरीप हंगाम २०२० साठी आधारभूत धान्य खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. त्यात जिल्ह्यातील ७९ धान्य खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त झालेल्या संस्थांना पत्र देऊन ३१ ऑक्टोबर पूर्वी धान खरेदी करण्याचे निर्देश दिले. शनिवार पूर्वी धान्य खरेदी सुरू झाली नाही तर परस्पर दुसऱ्या संस्थेची नियुक्ती केली जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे धान खरेदी सुरू होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तालुकानिहाय धान खरेदी केंद्र भंडारा :  वाकेश्वर, आमगाव, बेलगाव, बेला, पिपरी. मोहाडी :  मोहाडी, मोहगावदेवी, पालोरा, ताडगाव, आंधळगाव, रोहा,  डोंगरदेव, करडी, मुंढरी बुज, काटेबाम्हणी. तुमसर : मडगी,  खापा, आंबागड, एरली, चुल्हाड,  वाहनी, सिहोरा, बपेरा, हरदोली, गर्रा बघेडा, चिंचोली, नाकाडोंगरी. लाखणी :   मुरमाडी तूप, जेवणाळा,  मेंगापूर देवरी,  लाखोरी, लाखणी, सालेभाटा. साकोली :   एकोडी, परसोडी, सातलवाडा,  साकोली, विर्शी, सानगडी, वडद, निलज गोंदी, सुकळी, सावरबंध, पळसगाव, गोंड-उमरी. लाखांदूर :   पूयार,  लाखांदूर, बारव्हा, कुडेगाव, मासळ, विरली बूज, पारडी,  पिंपळगाव कोहळी, सरांडीबुज,  हरदोली,  भागडी,  दिघोरी, डोकेसरांडी,.कऱ्हाडला. पवनी : आसगाव, पवनी, अड्याळ, चकारा, कोदुर्ली, कोंढा, गोसे, वाही, चिचाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com