agriculture news in marathi sanction crop loan in time Akola district Magistrate instructs banks | Page 3 ||| Agrowon

बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत : जिल्हाधिकारी षण्मुगराजन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि रब्बी पीककर्ज वाटप योग्य वेळेत करण्यासोबतच विविध योजनांच्या लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे सुद्धा निर्धारित वेळेत मंजूर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.
 

वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि रब्बी पीककर्ज वाटप योग्य वेळेत करण्यासोबतच विविध योजनांच्या लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे सुद्धा निर्धारित वेळेत मंजूर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

मंगळवारी (ता.२८) आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स आढावा बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी सभेला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्‍थापक दत्तात्रय निनावकर, रिजर्व्ह बँकेचे जिल्हा प्रबंधक उमेश भंसाली, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्‍थापक शंकर कोकडवार, जिल्हा उपनिबंधक मैत्रवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सरनाईक, रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

षण्मुगराजन म्हणाले, ‘‘ज्या बँकांनी खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही, त्या बँकांनी येत्या दोन दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करावे. शक्यतो बँकांनी जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांतच खरीप पीककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ण करण्याचे यापुढे नियोजन करावे. तालुका पातळीवर होणाऱ्या बँकर्सच्या बैठकीला संबंधित तालुक्यातील बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी गैरहजर राहू नये. तसेच या बैठकीला संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी सुद्धा गैरहजर राहू नये. विविध महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकांनी संबंधित महामंडळाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. ज्या कार्यक्षेत्रासाठी बँका निश्‍चित करण्यात आल्या आहे, त्या क्षेत्रातील कर्जप्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी संबंधित बँकांनी घ्यावी.’’

किन्हीराजा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात यावी. शेतीपूरक व्यवसायासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तूर, सोयाबीन पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांकडे उत्पादित माल घरी ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे ते त्वरित मालाची विक्री करतात. त्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी उत्पादित मालाची साठवणूक करण्यासाठी विविध बँकांनी शेतकऱ्यांच्या समूहांना गोदाम बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात या हंगामात २७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४  हजार ७९१ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३ हजार ४३४ शेतकऱ्यांना ८७९ कोटी ११ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती निनावकर यांनी या वेळी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...