जळगावात महसुलासाठी वाळू लिलाव सुरू

जळगावात महसुलासाठी वाळू लिलाव सुरू
जळगावात महसुलासाठी वाळू लिलाव सुरू

जळगाव  : पर्यावरण विभागाची प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने आठ महिन्यांपासून रखडलेले वाळू लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. दुसरीकडे अवैध वाळूउपसा तापी, गिरणा नद्यांतून सुरू आहे. या संदर्भात प्रशासन फक्त महसुलासाठी आटापिटा करीत आहे. अवैध वाळूउपसा थांबविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील २८ वाळूगटांसाठी लिलाव करण्यात आले. यातील केवळ १० वाळूगटांचा लिलाव झाला. महसूल विभागाकडून आता उर्वरित १८ वाळूगटांसाठी तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. तिला प्रतिसाद मिळत नसल्याने तिसऱ्यांदा निविदा काढली. मात्र,  दुसरीकडे तापी, गिरणा नदीतून बेकायदा वाळूउपसा सुरूच आहे. मध्यंतरी पर्यावरण विभागाने वाळूउपसा करण्यासाठी मंजुरी दिली नाही. तरीदेखील बेकायदा वाळूउपसा सुरू होता. आता निवडणुकांचे कारण सांगून वाळूचोरी थांबविण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

पहिल्या निविदा प्रक्रियेत केवळ पाच गटांचा लिलाव झाला. त्यानंतर दुसऱ्या लिलाव प्रक्रियेत ३, तर आता तिसऱ्या लिलावामध्ये २ अशा एकूण २८ पैकी केवळ १० वाळूगटांचा लिलाव झाला. परंतु बेसुमार वाळूउपसा झाल्याने गिरणा, तापी नद्यांतून वाळूउपसा बंद करावा; अन्यथा भूगर्भात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

निविदाप्रक्रिया सुरू असलेले तालुकानिहाय वाळूगट

मुक्ताईनगर  पिंप्राळा
यावल पथराळे, थोरगव्हाण, पिंप्री
रावेर  धुरखेडा, दोधे, नेहते, निंभोरा बुद्रुक
भडगाव वाक
चोपडा घाडवेल, बुधगाव
अमळनेर सावखेडा, रुधांटी
पारोळा तामसवाडी, उंदीरखेडे
धरणगाव  नारणे
एरंडोल वैजनाथ
जळगाव नागझिरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com