agriculture news in Marathi, The Sanghli city, including the 'EVM' Machine fault in loksabha constituency | Agrowon

सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या बिघाडाने गोंधळ 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी शहरासह विविध तालुक्‍यांतील गावागावांमध्ये ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींचा पाऊस पडला. यापूर्वीही ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडाच्या तक्रारी झाल्या. मात्र, आजच्या इतक्‍या तीव्र नव्हत्या. यामागचे नेमके कारण अधिकारी स्पष्ट करू शकले नाहीत. सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत  सांगली 64.00 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र चुरशीने मतदान झाले. 

सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी शहरासह विविध तालुक्‍यांतील गावागावांमध्ये ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींचा पाऊस पडला. यापूर्वीही ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडाच्या तक्रारी झाल्या. मात्र, आजच्या इतक्‍या तीव्र नव्हत्या. यामागचे नेमके कारण अधिकारी स्पष्ट करू शकले नाहीत. सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत  सांगली 64.00 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वत्र चुरशीने मतदान झाले. 

सांगली लोकसभेत तिरंगी अशी लढत असून लोकसभेसाठी बारा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यात लोकसभेच्या मतदानासाठी सर्वच ठिकाणी सकाळपासून गर्दी झाली होती. जिल्ह्यातील देशिंग, आरग, बिऊर, आटपाडी, कवठेपिरान आणि ढालगाव या ठिकाणी येथे मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे मतदान सुरू होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे रांगा लागल्या होत्या. 

अनेक ठिकाणी यंत्रे बिघडली असल्याने मतदान न करताच नागरिक परत गेल्‍याचे चित्र पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच अनेक ठिकाणांहून गोंधळ आणि ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींची रीघ सुरू झाली. सकाळी-सकाळीच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांचे वादाचे प्रसंग घडले. प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी अधिकाऱ्यांची पळापळ झाली. 

सांगलीत त्रिकोणी बागेजवळ केंद्र क्रमांक २०७ वर गोंधळ झाला. कोणतेही बटण दाबले तरी मत कमळ चिन्हाला मिळत असल्याची तक्रार लोकांनी केली. वरिष्ठ अधिकारी तातडीने तेथे आले. त्यांनी तपासणीअंती तक्रार फेटाळली. भाजपलाच मतदान जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. 

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९४) यांनी आज हणुमंतवडिये (ता. खानापूर) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...