भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती’ची फारकत

दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून राज्यात दूध अंदोलनाची सुरवात करणाऱ्या दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने भाजपच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे.
milk collection
milk collection

नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून राज्यात दूध अंदोलनाची सुरवात करणाऱ्या दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने भाजपच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे. रयत क्रांती व भाजपने जाहिर केलेल्या गुरुवारच्या (ता. १३) अंदोलनात सहभागी होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन दिवसांत दूध अंदोलन जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली. समितीच्या नेत्यांनीही त्याला दुजोरा दिला.  राज्यात दुधाला किमान तीस रुपये दर मिळावा, त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट दहा रुपयाचे अनुदान जमा करावे, पडून असलेल्या दूध पावडरच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी प्रती किलो पन्नास रुपये अनुदान मिळावे यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात दूध दर अंदोलन होत आहे. त्यात भाजपासह विविध शेतकरी संघटना सहभागी आहेत. मात्र हे अंदोलन उभारण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते गेल्या दोन ते आडीच महिन्यांपासून तयारी करत आहेत. संगमनेर, अकोल्यासह राज्याच्या विविध भागात दूध दर अंदोलनाबाबत जागृती करत निवेदन मोहीमही राबवली.  गेल्या पंधरा दिवसांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा, रयत क्रांती संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटना व भाजपाने अंदोलन केले. आता नव्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा, रयत क्रांती व इतर काही संघटनांनी गुरुवार (ता. १३) पासून ‘लेटर टू सीएम'' मोहीम राबविण्याबाबत सोमवारी (ता.१०) एकत्रीत बैठक घेतली. मात्र मंगळवारी (ता.११) या अंदोलनात भाजपही सामील होत असल्याचे कळताच अंदोलनाचे राजकारण होण्याच्या भितीने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने ‘रयत क्रांती’ सोबतच्या अंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  ‘रयत क्रांती’ व भाजपच्या ऑनलाइन पत्रकार परिषदेतही किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सहभागी होणार असल्याबाबत सांगितले नाही. अगदी सुरवातीपासून दूध दरासाठी आग्रही असलेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा व काही शेतकरी संघटना दूध दराचे मोठे अंदोलन करणार असून त्याचे नियोजन दोव दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया राज्यात बहूतांश शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय हा पुरक नसून मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे दुधाला दर मिळालाच पाहिजे ही भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने सुरवातीपासून घेतली आहे. जोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यत लढा सुरुच राहिल. याच मागणीसाठी आम्ही तीव्र अंदोलन उभारत असून त्याबाबत लवकरच अंदोलनाचे स्वरुप जाहीर करणार आहोत.  - डॉ. अजित नवले, नेते, दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com