Agriculture news in marathi In Sangli, 68,000 farmers took out crop insurance | Agrowon

सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.

सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्हा बॅंकेतर्फे घेण्यात आलेल्या विम्याची माहिती अद्यापही अपलोड केली नाही. गतवर्षी १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. यंदा कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाउन त्यातच कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चालुवर्षी शेतकरी संख्या घटण्याची शक्यता आहे.

पिकांचे दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिपाऊस, यासह नैसर्गिक बाबींमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यांना पीक विमा देऊन त्याचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना राबवली जाते. जत तालुक्यात पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. यंदा पीक विमा भरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन केले. परंतू सातत्याने तांत्रिक अडचणींमुळे विमा भरण्यास अडथळे निर्माण झाले. त्याच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी यंत्रणा बंद होती. त्यातच जिल्हा प्रशासनाने २३ जुलै ते ३० जुलै आठ दिवस लॉकडाउन जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता करणे कठीण झाले. 

शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करुन पिकांना विम्याचे संरक्षण दिले. जिल्ह्यातील ६८ हजार ०१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला असला, तरी जिल्हा बॅंकेतील शेतकऱ्यांची संख्या यामध्ये अजून समाविष्ट केलेली नाही.  गतवर्षी अंदाजे १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी पिकांना विम्याचे संरक्षण दिले होते. यंदा शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...