Agriculture news in marathi From Sangli, 90 small vehicles depart from grapes across the country | Agrowon

Good News : सांगलीतून ९० लहान गाड्या द्राक्ष देशभरात रवाना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने मिळाल्याने ८० ते ९० लहान मोठ्या गाड्या देशभरात पोचवल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी डिझेल मिळत नसल्याने गाडी मालक आणि चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून गाड्यांना डिझेल उपलब्ध करण्यासाठी शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने मिळाल्याने ८० ते ९० लहान मोठ्या गाड्या देशभरात पोचवल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी डिझेल मिळत नसल्याने गाडी मालक आणि चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून गाड्यांना डिझेल उपलब्ध करण्यासाठी शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.

देशात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्याने संचार बंदी लागू केली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामध्ये भाजीपाला, फळे याची वाहतूक करता येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे द्राक्षाची वाहतूक सुरू होती. मात्र, पोलिसांकडून ही वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक केली जाऊ लागली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह गाडी चालक चिंतातूर झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि आरटीओ यांची बैठक घेऊन शेतीमाल करणाऱ्या वाहनांना परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने घेतले आहेत. जिल्ह्यातून द्राक्षाची वाहतूक सरू झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात सुमारे ८० ते ९० लहान मोठे ट्रक द्राक्ष घेऊन गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

डिझेल मिळेना
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वाहतूक सुरू केली. द्राक्ष घेऊन गाड्या अनेक ठिकाणी पोचल्या आहेत. काही येत्या दोन दिवसांत पोचतील. मात्र, डिझेलचा प्रश्न सुटला नाही. या गाड्यांना डिझेल मिळाले नाही तर पुढे गाड्या जाणार नाहीत. त्यामुळे सरकारने डिझेलचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.

विविध मागण्या

  • रस्ते मोकळे करावे
  • गाड्यांबरोबर बंदोबस्त द्यावा
  • वाहतूकीचे परवाने वाढवावेत
  • पेट्रोल-डिझेल उपलब्ध करुन द्यावेत
  • लहान व्यापाऱ्यांना विक्रीचे परवाने द्यावेत
  • शहरात द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांना वेळ ठरवून द्यावी

द्राक्ष उत्पादकांनी घाबरुन न जाता आपण आपल्या जवळचे मार्केटमध्ये परवाना घेऊन द्राक्षाची विक्री करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मी दोन किलोचे पॅकिंग करुन सांगली, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यात द्राक्षाची विक्री करणार आहे. त्यामुळे माझ्या द्राक्षाची विक्री होईल आणि दोन पैसेही अधिक मिळतील.
- मारुती चव्हाण,  द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली.

द्राक्ष काढणी सुरू झाली आहे. परंतू त्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्याचे उत्पादन बंद असल्याने पॅकिंग कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पॅकिंग साहित्याचे उत्पादक करणाऱ्या कंपन्या सुरू कराव्यात.
- संजय बरगाले, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मालगाव, ता. मिरज. 

द्राक्षाची वाहतूक सुरू झाली आहे. परंतू पंपावर डिझेल उपलब्ध करुन दिले जात नाही. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि शासनाने यावर मार्ग काढावा.
- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...