सांगली आजपासून तीन दिवस बंद

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू'' बरोबर सोमवार व मंगळवारीही कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
Sangli closed for three days from today
Sangli closed for three days from today

सांगली : ‘कोरोना’ विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू'' बरोबर सोमवार व मंगळवारीही कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस घराबाहेर न पडता स्वत:बरोबर इतरांच्या रक्षणाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले. 

मार्केट यार्डातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात शनिवारी (ता. २१) सायंकाळी सांगलीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या संघटनांची संयुक्त बैठक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, माजी महापौर सुरेश पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, ‘कॅट’चे अतुल शहा उपस्थित होते. 

कदम म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचा स्वतःसह कुटुंब आणि समाजाने संघटितपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. शासनाचे आदेश, कारवाईचा इशारा याची प्रतीक्षा न करता आपणही खबरदारी घ्या. गर्दीत जाणे टाळा. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाचे आदेश पाळा.’’ 

बारवे म्हणाल्या, ‘‘दूध, भाजीपाला, किराणा माल यासह जीवनाश्‍यक गोष्टींची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेऊन बंद पाळा. उपासमार होईल, असा कोणताही प्रकार नको. भविष्यात शटर डाउनची गरज पडली, तर अडचण येऊ नये, यासाठी दोन-तीन दिवस बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. कपडे, भांडी, कॉस्मेटिक अशा दैनंदिन वापरास आवश्‍यक नसणाऱ्या वस्तूंच्या व्यापार पेठ बंद ठेवा.’’

शहा म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी व्यापारी सदैव प्रशासन व जनतेसोबत राहतील. ``

गुरुवारी ठरणार पुढील धोरण 

आजच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) तिन्ही शहरांत कडकडीत बंद पाळला जाईल. त्यानंतर पुढील धोरण ठरवण्यासाठी गुरुवारी (ता. २५) बैठक घेतली जाणार आहे. आलटून-पालटून पेठा बंद ठेवण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. पेट्रोल-डिझेल अत्यावश्‍यक सेवा आहे. त्यामुळे आज कोणताही पंप बंद राहणार नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com