सांगली जिल्ह्यात ३८० गावे टंचाईच्या जाळ्यात

सांगली जिल्ह्यात ३८० गावे टंचाईच्या जाळ्यात
सांगली जिल्ह्यात ३८० गावे टंचाईच्या जाळ्यात

सांगली ः जिल्ह्यातील ३८० गावे टंचाईच्या जाळ्यात अडकली आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी प्रशासनाने हालचालीच केलेल्या दिसत नाहीत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा ‘टॅंकरमुक्त’ केला आहे. जिल्हा ‘टॅंकरमुक्त’ असल्याचा राज्य शासनाच्या दरबारात मुकूट मिरवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू होणार नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, कवेठमहांकाळ, जत तासगाव, खानापूर, या तालुक्‍यांतील ३८० गावे टंचाई जाहीर केली आहेत. मात्र, या तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांना टॅंकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

वास्तविक पाहता गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनी दुष्काळी भागातील पाणी टंचाईची वस्तुस्थिती पाहिली होती. त्या वेळी गरजेपेक्षा जास्त टॅंकर आणि टॅंकर माफिया सुरू झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी टॅंकरमुक्त करण्याचा निर्धार केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पाणीटंचाईची तीव्रता किती आहे, याचा आढावा घेऊनच टॅंकर सुरू करणार असल्याचे ठामपणे सांगितले. पण हा निर्धार वाडी-वस्त्यावरील ग्रामस्थांचा अंत पाहू लागला आहे. जिल्हा टॅंकरमुक्त जाहीर झाल्याचा एक दबाव प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे टॅंकर सुरू करायचे की नाहीत, याबाबत अद्यापही ठोस निर्णय घेतला नाही. दुष्काळी पट्ट्यातील गावांनी टॅंकरची मागणी केली आहे. परंतु या गावांनी टॅंकरमाफिया सुरू केली असल्याचा अाभास जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दुष्काळी पट्ट्यात सध्या टॅंकर सुरू करण्याची गरज आहे. पण याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकरी आक्रमक भूमिका घेण्यासाठी तयारी करू लागले आहेत.

टॅंकर देणार नसतील तर तलाव भरा जिल्हा टॅंकरमुक्त असे वारंवार सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन टॅंकर सुरू करणार नसतील तर. ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून तलाव भरुन द्यावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com