Agriculture news in Marathi In Sangli district, 50% grape pruning was completed | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष फळछाटणी उरकली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती वाढली आहे. पन्नास टक्के फळछाटणी झाली असून, जत तालुक्यात नोव्हेंबरमध्ये छाटणी सुरू होईल, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली.

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती वाढली आहे. पन्नास टक्के फळछाटणी झाली असून, जत तालुक्यात नोव्हेंबरमध्ये छाटणी सुरू होईल, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली.

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी सव्वा लाख एकर क्षेत्र आहे. जिल्ह्यामध्ये मिरज पूर्व भाग, आटपाडी या भागांत आगाप फळछाटणी घेतली जाते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची रिमझिम आणि बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली होती. त्यानंतर जिल्ह्यातील मिरज आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळ छाटणीस सुरुवात केली. 

वास्तविक पाहता आगाप छाटणीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र या वर्षी शेतकऱ्यांनी फळ छाटणी न करता टप्प्याटप्प्याने छाटणी सुरुवात केली आहे. त्यामुळे छाटणीचे काटेकोर नियोजन होत असल्याचे चित्र आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये छाटणी केलेल्या द्राक्षांना ४० दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. सध्या या भागात फुलोरा अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी वांझ, फूट काढण्याची कामे शेतकरी करू लागला आहे. 

सध्या द्राक्ष पिकास पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात साठ हजार मजूर असल्याने मजुरांची टंचाई भासत नाही. प्रत्येक भागामध्ये द्राक्ष पिकाचे वेगळे चित्र दिसते. पुढच्या पंधरा दिवसांपासून विरळणीचे करण्याचे काम सुरू होईल. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्व भागांत पाण्याची उपलब्धता असल्याने द्राक्ष पिकास पाणी कमी पडणार नाही. या महिना अखेर ८० टक्के छाटणी पूर्ण होईल.

जतमध्ये पुढील महिन्यात छाटणीस प्रारंभ
जत तालुक्यात प्रामुख्याने बेदाणा केला जातो. या भागात परतीचा पाऊस होतो. यामुळे द्राक्षाचे नुकसान होऊन होऊ नये यासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष फळछाटणी शेतकरी नियोजन करतात. यंदाही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणी सुरुवात होईल.;

या वर्षी उशिरा सुरू झाली आहे. सध्या पिकास पोषक वातावरण असल्याने आगाप फळ छाटणी घेतलेल्या बागेतील गर्भधारणा चांगल्या प्रकारे झाली आहे. आगाप घेतलेल्या फळछाटणी बागा घेतलेल्या फुलोरा अवस्थेत आहे.
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ


इतर अॅग्रो विशेष
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...