सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप गेले वाहून

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
In Sangli district, agricultural pumps were carried on the banks of the river Krishna
In Sangli district, agricultural pumps were carried on the banks of the river Krishna

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

 जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दोन दिवस धुवाधार पाऊस झाला. कृष्णा आणि वारणा नदीकाठी पाण्याच्या प्रवाहाने गेल्या वर्षीच्या महापुराने खचून गेली होती. यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली.

सततचा पाऊस व नदीतील वेगाच्या प्रवाहाने काठावरील जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. त्यामुळे काठचे असंख्य कृषी पंप पाण्यात वाहून गेले आहेत. त्याबरोबर त्याच्या जोडण्या, सक्शन पाइप, वीजपेट्याही गेल्या आहेत. खालचे जमिनीचे भाग तुटून गेल्याने बांधलेली केबीन ढासळली. काही ठिकाणी त्यांचा नामोनिशाणही राहिला नाही. 

पाणी पातळी उतरू लागताच त्याची भीषणता प्रत्ययास येत आहे. उघडीप होताच नदीकाठची माती ढासळत आहे. काही ठिकाणी तर दहा गुंठे ते एकरावर शेतजमीन पिकासह नदीने गिळंकृत केली आहे. त्याने नुकसानीमध्ये भर पडत आहे. पावसामुळे शेत शिवारात पाणी साठले आहे. पिके कुजू लागली आहेत. उभी पिके आडवी झाली आहेत.

गतवर्षीच्या प्रलयकारी महापुरात नदीकाठी प्रचंड मोठे नुकसान झाले. शेकडो कृषिपंप वाहून गेले. काठावरील वीजेचे खांब उन्मळून पडले. पिके गेली. जमिनी खचल्या. त्यातून आता कुठे शेतकरी सावरतोय. तोच या अस्मानी संकटाने शेतकरी पुरता गारद झाला आहे.

गेल्यावर्षीच्याच भरपाईची अजून प्रतीक्षा

शासनाने पावसाने झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. गेल्या वर्षीच्या महापुरातील घर पडझड व पीक नुकसानीची भरपाई अद्याप अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे सर्व शासकीय सोपस्कर पार करून पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या हाती नेमकी किती आणि कधी पडणार हे गुलदस्त्यात आहे. नदीकाठावर कृषिपंपांची पुन्हा नव्याने जोडणी करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com