Agriculture news in marathi, Of Sangli District Bank Curiosity for the post of vice president | Page 3 ||| Agrowon

सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची उत्सुकता

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. काँग्रेसमधील कोणाला उपाध्यक्ष पद मिळणार आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. काँग्रेसमधील कोणाला उपाध्यक्ष पद मिळणार आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. आता उपाध्यक्षपदाची उत्सुकता असून, निवडीचे अधिकार सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांना देण्यात आले आहेत.  त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. विरोधी भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने चार जागा राखत ताकद दाखवली. निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादीला ९, काँग्रेसचे ४, तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.

अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा असून आमदार नाईक हे प्रबळ दावेदार मानले जातात. तरीही काँग्रेसनेही शेवटची दोन वर्षे अध्यक्षपद मागितली आहेत. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अध्यक्षपद आधी काँग्रेसला घ्यायचे की नंतर घ्यायचे? तसेच उपाध्यक्षपद आधी घेतले तर संधी कोणाला द्यायची? या बाबतचे सर्वाधिकार कदम यांना देण्यात आले आहेत.

कदम यांनी अद्याप याबाबत जिल्हा बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांशी चर्चा केलेली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्यमंत्री कदम आणि आमदार अनिल बाबर यांच्यातही चर्चा झालेली नाही. त्यामुळे चर्चेनंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदी आमदार नाईक यांच्यावर शिक्कामोर्तब झाले असून घोषणा फक्त बाकी आहे. काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार असून, कोणाला बहुमान मिळणार याची उत्सुकता आहे. उपाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम ६ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.


इतर बातम्या
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...