जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार संजयकाकांची माघार 

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतूनभाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार संजयकाकांची माघार 
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार संजयकाकांची माघार 

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्‍चित झाली आहे. भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले. 

२१ जागांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी मंगळवारी (ता.९) गर्दी झाली होती.  सहकार विकास पॅनेल (महाआघाडी) : सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, खानापूर- अनिल बाबर, पलुस- महेद्र लाड, कडेगाव-मोहनराव कदम, वाळवा- दिलीप पाटील, शिराळा- मानसिंगराव नाईक, मिरज- विशाल पाटील, जत-विक्रम सावंत, तासगाव- बी. एस. पाटील. महिला राखीव- जयश्री मदन पाटील, अनिता विजय सगरे. अनुसूचित जाती जमाती- बाळासाहेब होनमोरे, ओबीसी -मन्सुर खतीब, विमुक्त जाती व भटक्या जमाती- राजेंद्र डांगे, इतर सहकारी संस्था- वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था- सुरेश पाटील, पतसंस्था गट- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था- हणमंतराव देशमुख, सुनील ताटे. महाआघाडीचे पॅनेल निश्‍चित केल्यानंतर भाजपाची यादी सोमवारी (ता. ८) उशिरापर्यंत जाहीर नव्हती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com