agriculture news in marathi Sangli district bank Election | Page 3 ||| Agrowon

जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार संजयकाकांची माघार 

वृत्तसेवा
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्‍चित झाली आहे. भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले. 

२१ जागांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी मंगळवारी (ता.९) गर्दी झाली होती. 

सहकार विकास पॅनेल (महाआघाडी) : सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, खानापूर- अनिल बाबर, पलुस- महेद्र लाड, कडेगाव-मोहनराव कदम, वाळवा- दिलीप पाटील, शिराळा- मानसिंगराव नाईक, मिरज- विशाल पाटील, जत-विक्रम सावंत, तासगाव- बी. एस. पाटील.
महिला राखीव- जयश्री मदन पाटील, अनिता विजय सगरे.
अनुसूचित जाती जमाती-बाळासाहेब होनमोरे,
ओबीसी-मन्सुर खतीब,
विमुक्त जाती व भटक्या जमाती-राजेंद्र डांगे,
इतर सहकारी संस्था- वैभव शिंदे,
प्रक्रिया संस्था-सुरेश पाटील,
पतसंस्था गट- किरण लाड, पृथ्वीराज पाटील,
मजूर संस्था- हणमंतराव देशमुख, सुनील ताटे.
महाआघाडीचे पॅनेल निश्‍चित केल्यानंतर भाजपाची यादी सोमवारी (ता. ८) उशिरापर्यंत जाहीर नव्हती. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...