सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव बिनविरोध करणार? 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. भाजप शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत.
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव बिनविरोध करणार?  Sangli District Bank Election Will Jayantrao do it unopposed?
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव बिनविरोध करणार?  Sangli District Bank Election Will Jayantrao do it unopposed?

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. भाजप शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत. पाटील जागावाटपाचा ‘फॉर्म्यूला’ आणि त्याची बेरीज ते कशी जमवतात यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. निवडणूक झालीच तर संचालकांशी संबंधित साडेपाचशे कोटींची कर्जे हाच मुद्दा गाजणार आहे.  जिल्हा बँकेत साधारण ४० वर्षांपूर्वी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. वसंतदादांनी त्यांच्याकडे धुरा सोपवली होती. तो काळ बँकेत राजकारण नाही, असा होता. काळानुरूप बँकही राजकारणाचा अड्डा झाली आणि आज त्याचे स्वरूप आपण अनुभवत आहोत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. या काळात सारे काही शांत असताना केन अॅग्रोच्या कर्जप्रकरणावरून बँकेतील संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला. एनपीएच्या उंबरठ्यावरील कर्जे हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची कर्जे संचालकांशी संबंधित संस्थांची आहेत. त्यामुळे संघर्ष टाळून बिनविरोधसाठी सर्वजण एकत्रित येतील, असे चित्र आहे.  एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पूर्वीचीच मंडळी इच्छुक असली तरी नव्याने काही वजनदार मंडळी बँकेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.  राजकीय पक्षानुसार बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे ६, भाजप २ आणि शिवसेना १, असे चित्र आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. तशातच चारही पक्षात इच्छुक वाढलेत. त्यामुळे बँकेत विद्यमान काही संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. 

जयंत पाटील बँकेवर पकड कायम राहणार?  जयंत पाटील बँकेसाठी सर्वांची मोट बांधण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार संजय पाटील, विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याही भूमिका निर्णायक असतील. आठवडाभरात अंतिम चित्र कळेल. संस्थात्मक बांधणीवरच या निवडणुकीचे यश ठरते. विद्यमान काही संचालकांनी ती जुळणी आधीच केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपावर पुढचे चित्र ठरणार आहे. जयंतरावांकडून सर्वांसोबत चर्चा आणि व्यूहरचना सुरू आहे. निवडणूक लागली तरी काही चेहरे कायमच असतील असे दिसते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com