Agriculture News in Marathi Sangli District Bank Election Will Jayantrao do it unopposed? | Agrowon

सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव बिनविरोध करणार? 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. भाजप शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत.

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. भाजप शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत. पाटील जागावाटपाचा ‘फॉर्म्यूला’ आणि त्याची बेरीज ते कशी जमवतात यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. निवडणूक झालीच तर संचालकांशी संबंधित साडेपाचशे कोटींची कर्जे हाच मुद्दा गाजणार आहे. 

जिल्हा बँकेत साधारण ४० वर्षांपूर्वी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. वसंतदादांनी त्यांच्याकडे धुरा सोपवली होती. तो काळ बँकेत राजकारण नाही, असा होता. काळानुरूप बँकही राजकारणाचा अड्डा झाली आणि आज त्याचे स्वरूप आपण अनुभवत आहोत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. या काळात सारे काही शांत असताना केन अॅग्रोच्या कर्जप्रकरणावरून बँकेतील संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला. एनपीएच्या उंबरठ्यावरील कर्जे हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची कर्जे संचालकांशी संबंधित संस्थांची आहेत. त्यामुळे संघर्ष टाळून बिनविरोधसाठी सर्वजण एकत्रित येतील, असे चित्र आहे. 

एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पूर्वीचीच मंडळी इच्छुक असली तरी नव्याने काही वजनदार मंडळी बँकेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

राजकीय पक्षानुसार बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे ६, भाजप २ आणि शिवसेना १, असे चित्र आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. तशातच चारही पक्षात इच्छुक वाढलेत. त्यामुळे बँकेत विद्यमान काही संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. 

जयंत पाटील बँकेवर पकड कायम राहणार? 
जयंत पाटील बँकेसाठी सर्वांची मोट बांधण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार संजय पाटील, विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याही भूमिका निर्णायक असतील. आठवडाभरात अंतिम चित्र कळेल. संस्थात्मक बांधणीवरच या निवडणुकीचे यश ठरते. विद्यमान काही संचालकांनी ती जुळणी आधीच केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपावर पुढचे चित्र ठरणार आहे. जयंतरावांकडून सर्वांसोबत चर्चा आणि व्यूहरचना सुरू आहे. निवडणूक लागली तरी काही चेहरे कायमच असतील असे दिसते.
 


इतर बातम्या
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा...अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...
यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘...यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल...
शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या...बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व...नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व...
मराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा...
खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी...जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत...
सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार...सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर...