Agriculture news in Marathi Sangli District Bank inquiry order | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेच्या चौकशीचे आदेश

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात अवास्तव खर्च केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल झाल्यामुळे सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत.

सांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात अवास्तव खर्च केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल झाल्यामुळे सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत. विभागीय सहनिबंधकांनी तत्काळ या प्रकरणी कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे. 

चिखली (ता. शिराळा) येथील मानसिंग फ. नाईक विकास सहकारी संस्थेने विभागीय आयुक्तांकडे बँकेच्या चौकशीची मागणी केली होती. त्यात बँकेमधील इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखांतील फर्निचर खरेदी, एटीम मशिन खरेदी, नोटा मोजण्याचे मशिन खरेदी आदी बाबींवर गरज नसताना ३० ते ४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी तक्रार होती. शिवाय, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी, महिला बचत गट यांचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखन, बँक संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटीचे कर्ज कार्यालयाची शिफारस नसताना देणे, टेंडर न काढता ७२ कोटी ६८ लाख रुपयांचे फर्निचर खरेदी करणे, शाखा नूतनीकरण, विकास संस्था संगणकीकरणासाठी ११ कोटी खर्च, महांकाली कारखान्याकडील कर्ज वसूल न करणे, स्वप्नपूर्ती शुगर्स कारखान्याला चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज देणे, २१ तांत्रिक पदे बोगस कागदपत्रांच्या आधारे भरणे हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या आधारे चौकशी करण्यात येणार आहे.

स्वपक्षीय आमदाराच्या सोसायटीकडून तक्रार
सध्या या बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बँकेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सध्या सत्ता असून त्यांच्याच पक्षाचे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांचे विश्‍वासू जुने सहकारी दिलीप पाटील गेली सहा वर्षे अध्यक्ष आहेत.


इतर अॅग्रो विशेष
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...