Agriculture News in Marathi Of Sangli District Bank Postponement of inquiry | Agrowon

  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला स्थगिती 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

सागंली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा कलम ८३नुसारच्या चौकशीला सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. चार संचालकांनी दाखल केलेल्या पत्राच्या आधारे ही स्थगिती देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा कलम ८३नुसारच्या चौकशीला सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. बाळासाहेब होनमोरे यांच्यासह चार संचालकांनी दाखल केलेल्या पत्राच्या आधारे ही स्थगिती देण्यात आल्याचे कक्ष अधिकारी सरोज पावसकर यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह संचालकांनी निश्‍वास टाकला आहे. 

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक, आमदार मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी केलेल्या तक्रारीनुसार पुणे विभागीय सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिले होते. विशेष चाचणी लेखापरीक्षण किंवा सहकार कायदा कलम ८३ अन्वये ही चौकशी करावी, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार सहा सदस्यांची समिती नियुक्त केली होती. चौकशीला प्रत्यक्ष सुरवात करण्याच्या दृष्टीने समितीने तयारीही सुरू केली होती.

या चौकशीत बँकेची इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखांतील फर्निचर खरेदी, एटीएम मशिन्स खरेदी, नोटा मोजण्याचे यंत्र खरेदी आदींवर ३० ते ४० लाख रुपयांचा अनावश्‍यक खर्च केल्याचा मुद्दा प्रमुख होता. 

सोबतच, ६० लाखांचे कर्ज निर्लेखित करणे, बँक संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटींचे कर्ज देणे, कोटेशन न घेता फर्निचर खरेदी, शाखा नूतनीकरण, विकास संस्था संगणकीकरणासाठी १ कोटी ७४ लाखांचा खर्च, महांकाली कारखान्याची वसुली न करणे, स्वप्नपूर्ती कारखान्यास चुकीच्या पद्धतीने कर्ज देणे, २१ तांत्रिक पदे बोगस कागदपत्रांच्या आधारे भरणे आदी मुद्द्यांचा समावेश होता. यात नव्याने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ॲग्रो कारखान्याच्या कर्ज प्रकरणाच्या चौकशीचाही समावेश करण्यात आला होता.

या चौकशीविरोधात संचालक बाळासाहेब होनमोरे, झुंझारराव शिंदे यांच्यासह चार संचालकांनी सहकार विभागाला पत्र लिहले. त्या पत्राच्या अनुषंगाने या चौकशीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर बँकेला म्हणणे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रतिक्रिया

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील चौकशीला सामोरे जायला तयार आहे म्हणत होते, मग ते मुंबईत तळ ठोकून का बसले आहेत. चार संचालकांच्या 
नावाने पत्र लिहून त्यांनी चौकशीला स्थगिती मिळवण्याची गरज होती का? यातच जे समजायचे ते समजते. 
-सुनील फराटे, तक्रारदार 

फराटे माझ्या दृष्टीने बेदखल आहे. त्याच्या तक्रारींची या पूर्वी चौकशी होऊन क्लीन चिट मिळाली आहे. तसेच या पूर्वीही बॅंकेच्या चौकशा होऊन काहीच निष्पन्न झाले नाही. बॅंक ही आर्थिक संस्था असून, त्यामध्ये राजकारणातून चौकशी लावू नये. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. 
-दिलीप पाटील, अध्यक्ष, जिल्हा बॅंक


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...