Agriculture news in marathi Sangli District Bank postpones dividend allocation | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेचा लाभांश वाटप लांबणीवर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक मंदीत बँकांचा नेटवर्थ सक्षम राहावा या उद्देशाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३० सप्टेंबरपर्यंत लाभांश वाटप न करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने याची अंमलबजावणी करीत लाभांश वाटप लांबणीवर टाकले आहे. 

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक मंदीत बँकांचा नेटवर्थ सक्षम राहावा या उद्देशाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३० सप्टेंबरपर्यंत लाभांश वाटप न करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने याची अंमलबजावणी करीत लाभांश वाटप लांबणीवर टाकले आहे. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातील आघाडीवरची सक्षम बँक असल्याने लाभांश वाटपही दरवर्षी चांगल्या प्रमाणात होत असतो. लाभांश वाटपाची ही रक्कम १७ कोटी रुपयांच्या घरात जाते. यंदा या लाभांशापासून काही काळ सभासदारांना दूर रहावे लागणार आहे. येत्या काही दिवसांत कर्जवाटपास प्राधान्य देऊन प्रत्येक क्षेत्राला चालना देण्याची जबाबदारी बँकांवर येणार आहे. 

यात कृषी क्षेत्राला सर्वाधिक आधार द्यावा लागणार असल्याने शेतकऱ्यांची बँक म्हणून सांगली जिल्हा बँकेला अधिक जबाबदारी उचलावी लागेल. कर्जवाटप करताना भविष्यात नफ्याचे प्रमाण घटण्याचीही शक्यता आहे. देशभरातील बँकिंग क्षेत्राला याचा अनुभव येणार आहे. अशा काळात लाभांश वाटप झाले तर बँकांचे नेटवर्थ कमी होऊ शकते. हे नेटवर्थ सक्षम रहावे म्हणून लाभांश वाटपाची रक्कम शिल्लक रहावी, असा रिझर्व्ह बँकेचा उद्देश आहे. 

त्यामुळेच देशभरातील बँकांना त्याबाबतचे आदेश देण्यात येत आहेत. सांगली जिल्हा बँकेने याबाबत अंमलबजावणी केल्याने ३० सप्टेंबरपर्यंत लाभांश वाटपाची प्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. सप्टेंबर महिन्यात आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांची किंवा तिमाही काळाची आर्थिक पाहणी करून लाभांश वाटपाचा निर्णय त्यावेळी घेतला जाणार आहे. 

त्यामुळे तूर्त सभासदांना आणखी काही काळ लाभांशाची प्रतीक्षा करावी लागेल. जिल्हा बँकेच्या नफ्यातून शाखा सक्षमीकरणासाठी यंदा निधी द्यायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. आगामी आर्थिक परिस्थिीतीचा विचार यासाठी केला जाण्याचीही शक्यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...